शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
3
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
4
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
5
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
6
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
7
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
8
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
9
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
10
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
11
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
12
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
13
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
14
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
15
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
16
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
17
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
18
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
19
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
20
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्राविरुद्ध आंदोलन - छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 05:37 IST

Chhagan Bhujbal : राज्यात भाजपचे सरकार असतानाही न्यायालयाने प्रायोगिक आकडेवारीची (इंपेरिकल डेटा) मागणी केली होती. मात्र, केंद्र सरकारने ती माहिती दिली नाही. केंद्र सरकारने तो डाटा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचेही भुजबळ म्हणाले.  

मुंबई : घटनात्मक तरतुदींच्या अभावी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. या निर्णयाचा परिणाम देशभर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व ओबीसी संघटनांनी एकत्रितपणे लढा देण्याची गरज असल्याचे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी व्यक्त केले. 

न्यायालयीन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अखिल भारतीय समता परिषदेची बैठक मुंबईत झाली. यात ओबीसी आरक्षण बचावासाठी केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. राज्यात भाजपचे सरकार असतानाही न्यायालयाने प्रायोगिक आकडेवारीची (इंपेरिकल डेटा) मागणी केली होती. मात्र, केंद्र सरकारने ती माहिती दिली नाही. केंद्र सरकारने तो डाटा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचेही भुजबळ म्हणाले.  

ओबीसी आरक्षणासाठी सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांशी चर्चा सुरूच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितली आहे. या भेटीत मराठा, ओबीसी आरक्षणाची वस्तुस्थिती समजावून सांगणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. राज्यात ओबीसी समाजासाठी अनेक लोक आंदोलन करत आहेत.  त्याचे आम्ही स्वागतच करतो. आजक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात नाराजी आहे. त्यामुळे आगामी काळात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या पुढे ढकलता आल्या तर योग्य होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

यावेळी भुजबळ यांनी महाराष्ट्रातील किती स्थानिक स्वराज्य संस्थांवर न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो, याची आकडेवारी मांडली. राज्यातील २७ महापालिकेच्या एकूण २ हजार ७३६ जागांमधून ७४० जागा कमी होत आहेत. १२८ नगर पंचायती व २४१ नगरपालिकांतील ७ हजार ४९३ जागांपैकी २ हजार ९९ जागा कमी होणार आहेत. तर ३४ जिल्हा परिषदेतील ५३५ जागा, ३५१ पंचायत समितींमध्ये १ हजार २९ जागा कमी होणार आहेत.  २७ हजार ७८२ ग्रामपंचायतींमध्ये अंदाजे ५१ हजार ४८६ ओबीसी समाजाच्या जागा कमी होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळOBC Reservationओबीसी आरक्षण