शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

अहो आश्चर्यम्... देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांचा 'ठाकरे सरकार'ला एकसारखाच सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 19:06 IST

after shiv sena mp sanjay raut bjp leader devendra fadnavis thinks thackeray government should introspect: रविवारी संजय राऊत यांनी सरकारला सल्ला दिल्यानंतर दोनच दिवसांनी फडणवीसांनी सरकारला सल्ला दिला आहे.

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार (Mukesh Ambani Security Scare) आढळल्यापासून राज्याच्या राजकारणात स्फोटक घडामोडी घडत आहेत. स्फोटकांचा तपास करणारे पोलीस अधिकारी सचिन वाझेंना (Sachin Vaze) झालेली अटक, त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग (Param Bir Singh) यांची झालेली बदली, त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेले अतिशय गंभीर आरोप यांच्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं असताना विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षानं ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.मी सरकारच्या चहाचा ओशाळा नाही! राऊतांचा सूर बदलला; राज्य सरकारला दिला 'मोलाचा' सल्लागृहमंत्री सचिन वाझेंना गृहमंत्री देशमुख यांनी १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे केला. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर असून देशमुख यांनी राजीनामा देण्याची मागणी भाजपनं केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थोड्याच वेळापूर्वी दिल्लीत गृह सचिवांची भेट घेतली. पोलीस खात्याच्या बदलांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे पुरावे सचिवांकडे सोपवल्याचं फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितलं. राज्य सरकारला आत्मचिंतनाची गरज असल्याचं ते म्हणाले.

सर्व पुरावे बंद लिफाफ्यात गृह सचिवांना दिलेत, आता योग्य ती कारवाई होईल: देवेंद्र फडणवीससंजय राऊतांनीदेखील दिला होता आत्मचिंतनाचा सल्लाराज्यातील सरकारला दीड वर्ष पूर्ण झालं आहे. सरकारमधील घटकांनी आत्मपरिक्षण करावं. आपले पाय जमिनीवर आहेत की नाही ते तपासून पाहावं, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दोनच दिवसांपूर्वी सरकारला दिला होता. परमबीर सिंग यांच्या खळबळजनक पत्रावर बोलताना त्यांनी हा सल्ला दिला होता. या घटनेमुळे सरकारवर नक्कीच शिंतोडे उडाले आहेत. यासंदर्भात अनेकदा मी सामनामधून लिहित असतो. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असं सूचक विधान राऊत यांनी केलं होतं.राऊतांनी ट्विट केलेल्या शायरीचा अर्थ काय..?संजय राऊत यांनी रविवारी एक शायरी ट्विट केली होती. 'हमको तो तलाश बस नये रास्तों की है, हम है मुसाफिर ऐसे जो मंझिल से आए है...' असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. राऊत यांच्या ट्विटचा नेमका अर्थ काय, अशी चर्चा रंगू लागली. याबद्दल विचारलं असता, त्याचा अर्थ तुम्हाला लवकरच कळेल, असं सूचक उत्तर त्यांनी दिलं. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतMukesh Ambaniमुकेश अंबानीsachin Vazeसचिन वाझेShiv SenaशिवसेनाParam Bir Singhपरम बीर सिंगAnil Deshmukhअनिल देशमुख