शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या मोठ्या निर्णयानंतर रक्षा खडसेंनीही भाजपाबाबत केली भूमिका स्पष्ट, म्हणाल्या...

By बाळकृष्ण परब | Updated: October 21, 2020 17:01 IST

Eknath Khadse News : एकनाथ खडसेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण प्रवेश करणार याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, खडसेंच्या सूनबाई आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांनीही भाजपाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ठळक मुद्देएकनाथ खडसेंच्या घोषणेनंतर रक्षा खडसे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होतेमी भाजपा सोडून जाणार नाही. मी भाजपामध्येच राहणार आहेएकनाथ खडसे यांनी वैयक्तिक कारणांमुळे भाजपाला रामराम ठोकला आहे

मुंबई - राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनीभाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा करत राज्यातील राजकारणात भूकंप घडवून आणला आहे. एकनाथ खडसे हे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. आता एकनाथ खडसेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण प्रवेश करणार याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, खडसेंच्या सूनबाई आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांनीही भाजपाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.एकनाथ खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर रक्षा खडसे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, रक्षा खडसे म्हणाल्या की, मी भाजपा सोडून जाणार नाही. मी भाजपामध्येच राहणार आहे. एकनाथ खडसे यांनी वैयक्तिक कारणांमुळे भाजपाला रामराम ठोकला आहे. मात्र भारतीय जनता पक्षामध्ये मला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. त्यामुळे मी भाजपामध्येच राहीन.दरम्यान, एकनाथ खडसे यांनीही रक्षा खडसे ह्या भाजपा सोडणार नसल्याचे सांगितले होते. तसेत तो त्यांच्या निर्णय आहे, असेही ते म्हणाले होते. त्याबरोबरच आपल्यासोबत एकही आमदार आणि खासदार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार नसल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाचे राज्यातील विविध भागांमधील आमदार आपल्या संपर्कात असल्याचे विधान करून राजकीय खळबळ उडवून दिली होती.गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, खडसे हे शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अधिकृतरीत्या घोषणा केली आहे.मुंबईत २३ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. सांगितलं जात आहे. एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.

 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेBJPभाजपाJalgaonजळगावPoliticsराजकारण