शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

युतीच्या घोषणेनंतरही मावळवर भाजपाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 16:50 IST

मावळ लोकसभा मतदार संघ शिवसेनेला दिला असताना पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदार संघातील भाजपाच्या नगरसेवकांनी मावळवर दावा केला आहे.

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड शहरात भाजपाकडून शिवसेना नेते आणि नगसेवक टार्गेट

पिंपरी : लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती जाहीर झाली आहे. मावळ लोकसभा मतदार संघ शिवसेनेला दिला असताना पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदार संघातील भाजपाच्या नगरसेवकांनी मावळवर दावा केला आहे. नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात भाजपाच्या काही नगरसेवकांनी पंधरा दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन दावा केला. बारणेंना उमेदवारी दिली तर काम करणार नाही, अशीही भूमिका घेतली होती. त्यापूर्वी दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भाजपाच्या संकल्प मेळाव्यात मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघ भाजपालाच मिळावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी बारणे यांच्या उमेदवारीवरून शिवसेना आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांमध्ये जुंपली होती. बारणे नकोच असा सूर भाजपातील काही ज्येष्ठ तसेच राष्ट्रवादीतून काँग्रेसमधून भाजपात आलेल्यांनी आळविला होता. दुसरीकडे महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांच्यावर मारहाणीचा दखलपात्र गुन्हाही दाखल झाला होता. भाजपाच्या नेत्यांच्या दबावाने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. युतीची घोषणा केली असली तरी पिंपरी-चिंचवडमधील भाजपाच्या नेत्यांत अस्वस्थता असल्याचे दिसून येत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुणे दौरा होता. त्यावेळी  पुण्यात शिवाजी नगर येथे पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघातील नगरसेवकांचा समावेश होता. महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक शत्रुघ्न काटे, शर्मिला बाबर यांनी भेट घेतली. मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपा मिळावा, शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे.  भाजपाकडून शिवसेना टार्गेटपिंपरी-चिंचवड शहरात भाजपाकडून शिवसेना नेते आणि नगसेवकांना टार्गेट केले जात आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला असून युतीचा तिढा सुटला असला तरी भाजपा आणि शिवसेनेतील नेत्यांचे मनोमिलन कधी होणार? होणार की नाही? हा खरा प्रश्न आहे

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmavalमावळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना