शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

मुंबई काँग्रेस अध्यक्ष नियुक्तीच्या घडामोडींना वेग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 22:35 IST

Mumbai Congress President : माजी खासदार एकनाथ गायकवाड हे सध्या मुंबई काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

ठळक मुद्देडॉ. अमरजीत सिंग मनहास यांच्यासह कामगार नेते भाई जगताप, माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, माजी मंत्री नसीम खान, चरणजित सप्रा, मधू चव्हाण यांची नावे मुंबई अध्यक्षपदासाठी  चर्चेत आहेत. 

- मनोहर कुंभेजकर

मुंबई - गेल्या दीड वर्षापासून रखडलेली मुंबईकाँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची घोषणा लवकर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माजी खासदार एकनाथ गायकवाड हे सध्या मुंबई काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तर गेली 40 वर्षे काँग्रेसमध्ये कार्यरत असलेले डॉ. अमरजीत सिंग मनहास यांच्यासह कामगार नेते भाई जगताप, माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, माजी मंत्री नसीम खान, चरणजित सप्रा, मधू चव्हाण यांची नावे मुंबई अध्यक्षपदासाठी  चर्चेत आहेत. 

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर मुंबईत आले होते. मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड, आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीची रणनीती आणि मुंबईत काँग्रेस पक्ष कसा मजबूत करण्यासंदर्भात एच. के. पाटील यांनी मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली होती. 

गेल्या ऑक्टोबर महिन्यात तसेच दिवाळीनंतर आणि आता एच. के. पाटील यांनी मुंबईचा दौरा केला आहे. या तीन राऊंडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मुंबईतील काँग्रेसचे माजी आमदार, माजी खासदार, माजी मंत्री, विद्यमान आमदार, विद्यमान मंत्री, विविध सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आता पूर्ण झाली असून आपला अहवाल ते काँग्रेस पक्ष श्रेष्टींकडे ठेवतील. त्यामुळे लवकरच मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड घोषित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या झालेल्या भेटीदरम्यान अनेक मान्यवरांनी डॉ. अमरजीत मनहास यांच्या नावाला पसंती दिल्याचे समजते.

मुंबई पालिकेची निवडणूक स्वबळावर लढाआगामी पालिका निवडणूक पक्षाने स्वबळावर लढवावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे केली आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय काँग्रेस पक्ष श्रेष्टींच घेतील, असे सांगण्यात आले. तसेच, यावेळी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांची निवड लवकर जाहीर करा, अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली. याशिवाय, येत्या ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागतील. प्रभागांचे आरक्षण निश्चित होईल. आचारसंहिता लागू होईल. नवीन अध्यक्षांना काम करायला वेळ मिळणार नाही. त्यामुळे आता त्वरित निर्णय घ्यावा, असे निवेदन देखिल शिष्टमंडळाने एच. के.  पाटील यांना दिल्याचे समजते. 

टॅग्स :congressकाँग्रेसMumbaiमुंबईPoliticsराजकारण