शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये NDAचाच बोलबाला, 40 पैकी 34 जागांवर मिळवणार कब्जा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 20:20 IST

गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे.

नवी दिल्लीः गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. राहुल गांधी आणि मोदी ठिकठिकाणी सभा घेत आहेत. त्याचदरम्यान अनेक संस्थांनी सर्व्हे करण्यासही सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर एबीपी माझा आणि नील्सननं निवडणूकपूर्व सर्व्हे केला असून, उत्तर बिहारमधल्या 12 पैकी 11 जागांवर एनडीए विजयी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. या 40 मतदारसंघांतल्या 10 हजार 212 लोकांची मतं जाणून घेतली आहे.उत्तर बिहारमधल्या 12 पैकी 11 जागांवर एनडीएचा विजय होणार आहे, असं सर्व्हेत म्हटलं आहे. वाल्मिकीनगर, पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, शिवहर, मुजफ्फरपूर, वैशाली, हाजीपूर, सारण, सीवान, महाराजगंज, गोपालगंज या मतदारसंघांमध्ये भाजपा विजयी होण्याची शक्यता असून, सीतामढीची जागा यूपीएकडे जाण्याची शक्यता आहे. तर बिहारच्या मिथिलांचल क्षेत्रातील नऊच्या नऊ जागांवर एनडीएचा विजय होण्याचा अंदाज आहे. सुपौल, मधेपुरा, खगडिया, बेगुसराय, झंझारपूर, मधुबनी, दरभंगा, समस्तीपूर आणि उजियारपूरमधून एनडीएला विजय मिळणार असल्याचा अंदाज आहे.

बिहारमध्ये 40 जागांपैकी 35हून जास्त जागा एनडीए जिंकण्याचा आडाखे बांधले जात आहेत. तर बिहारच्या सीमांचल पूर्व बिहारमध्ये 7 जागांपैकी चार जागा एनडीए जिंकणार असल्याचा दावा केला जातोय. तर यूपीएसुद्धा 3 जागांवर विजय मिळवू शकते. सर्व्हेनुसार, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, जमुई या जागांवर एनडीएचा विजय होणार असून, अररिया, भागलपूर आणि बांका जागेवर यूपीएचं खातं उघडणार आहे. एबीपी-नील्सनने हा सर्व्हे 17 ते 26 मार्चदरम्यान केला आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमारBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019