शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

७० टक्के तरुणांना हवा केवळ चार दिवसांचा आठवडा, तर पूर्णवेळ कार्यालयाबाबत ७६ टक्के कर्मचारी म्हणतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 10:13 IST

Four days a week : भारतातील बहुतांश तरुण कर्मचाऱ्यांना ४ दिवसांचा कामकाजी आठवडा हवा आहे. यासंबंधी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात १० पैकी ७ तरुण कर्मचाऱ्यांनी ४ दिवसांच्या कामकाजी आठवड्याच्या बाजूने कौल दिला आहे.

नवी दिल्ली : भारतातील बहुतांश तरुण कर्मचाऱ्यांना ४ दिवसांचा कामकाजी आठवडा हवा आहे. यासंबंधी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात १० पैकी ७ तरुण कर्मचाऱ्यांनी ४ दिवसांच्या कामकाजी आठवड्याच्या बाजूने कौल दिला आहे.‘सायट्रिक्स सिस्टिम्स’ने केलेल्या ‘बॉर्न डिजिटल इफेक्ट’ सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणानुसार, भारतातील तरुण पिढी करिअरच्या बाबतीत सर्वाधिक ९४ टक्के प्राधान्य स्थैर्य आणि सुरक्षेला देते. पात्रता वृद्धी तसेच प्रशिक्षण अथवा कौशल्य वृद्धीला ९३ टक्के, तर उच्च दर्जाचे कार्यस्थळ यास ९२ टक्के प्राधान्य मिळाले आहे.  सर्वेक्षणाच्या अहवालानुसार ७६ टक्के कर्मचारी साथपश्चात काळात पूर्णवेळ कार्यालयात बसून काम करू इच्छित नाहीत. घरी बसून अथवा हायब्रिड कार्यपद्धतीला ते पसंती देत आहेत. ‘सायट्रिक्स’च्या शासकीय उपाध्यक्ष आणि मुख्य व्यक्ती अधिकारी डोना किमेल यांनी सांगितले की, ही तरुण पिढी आधीच्या पिढ्यांपासून पूर्णत: वेगळी आहे. कंपन्यांना यशस्वी व्हायचे असेल, तर या तरुणांची मूल्ये, करिअरविषयी महत्त्वाकांक्षा आणि कार्यशैली या बाबी समजून घ्याव्या लागतील. त्यांच्या विकासासाठी गुंतवणूक करावी लागेल. भारतातील ७६ टक्के बॉर्न डिजिटल कर्मचाऱ्यांना वाटते की, साथीनंतर कंपन्यांनी ५ ऐवजी ४ दिवसांचाच कामकाजी आठवडा करायला हवा. साथीमुळे बदललेल्या परिस्थितीत आठवड्यातील कामाचे दिवस कमी व्हायला हवेत, असे त्यांना वाटते. कंपनी निवडण्याच्या बाबतीत तीन घटकांची निवड करण्यास सांगितले, तेव्हा या तंत्रज्ञांनी स्वायत्तता व  विश्वसनीय वातारण,  नवता आणि शिकण्याची दिशा व वृद्धी यांना प्रत्येकी ९० टक्के प्राधान्य दिले. 

nबाॅर्न डिजिटल ही संस्था मिलेनिअल्स (१९८१ ते १९९६ दरम्यान जन्मलेले) तसेच जनरेशन झेड (१९९७ नंतर जन्मलेले) यांच्यासाठी वापरली जाते. ही पिढी संपूर्ण डिजिटल जगात विकसित झाली असून, जगातील श्रमशक्तीत तिचा वाटा मोठा आहे. 

टॅग्स :Employeeकर्मचारीjobनोकरी