शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

"मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धमाका; भाजपचे ६-७ खासदार पक्ष सोडणार" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 19:34 IST

भाजपमध्ये गेलेले अनेक आमदार माघारी परतणार असल्याचा तृणमूलच्या मंत्र्याचा दावा

कोलकाता: विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आल्यानं पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेससमोर भारतीय जनता पक्षानं मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. त्यातच गेल्या काही आठवड्यांपासून तृणमूल काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. पक्षाच्या अनेक आमदारांनी राजीनामे देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता तृणमूलनं भाजपला धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे.गेल्याच महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीपश्चिम बंगालचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान तृणमूलच्या अनेक आमदारांनी कमळ हाती घेतलं. भाजपच्या या राजकारणाला तृणमूलनं त्याच पद्धतीनं उत्तर देण्याची तयारी केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भाजपचे ६-७ खासदार तृणमूलमध्ये येतील, असा दावा तृणमूलचे नेते आणि पश्चिम बंगालचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांनी केला.स्वामी विवेकानंद यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त उत्तर २४ परगणा जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभादरम्यान मलिक यांनी केलेल्या दाव्यानं खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या शुभेंदु अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. त्याबद्दल विचारलं असता, ते तिथे का गेले ते मलादेखील माहीत नाही. ते भाजपमध्ये ४-५ महिने राहतील का, असा प्रश्न मला पडला आहे. कदाचित त्यांचं काम झाल्यावर ते पक्ष सोडतील, असं मलिक म्हणाले.पुढील काही महिन्यांत भाजपमध्ये एकही व्यक्ती दिसणार नाही. लवकरच ६-७ खासदार तृणमूलमध्ये येतील. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात त्यांचा पक्षप्रवेश होईल. यामध्ये तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्यांचादेखील समावेश आहे. तृणमूलमध्ये घरवापसी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नेत्यांची यादी मोठी आहे. ही मंडळी लवकरच स्वगृही परततील, असा दावा मलिक यांनी केला.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीAmit Shahअमित शहा