शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तरुणीसोबत तू लग्न का केलेस, म्हणत तरुणावर कोयता, सत्तूरने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 14:44 IST

विद्यानगर, चिंचवड येथील घटना

पिंपरी : तरुणाने दुचाकीस्वाराला अडविले. मला लग्न करायचे असलेल्या तरुणीसोबत तू लग्न करून नकोस, असे सांगूनही तू तिच्यासोबत लग्न केले, असे म्हणून तरुणाने व इतर तीन जणांनी दुचाकीस्वाराला कोयत्याने व सत्तूरने वार करून गंभीर जखमी केले. खुनी हल्ल्याप्रकरणी चौघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विद्यानगर, चिंचवड येथे सोमवारी (दि. ११) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.

संतोष कळसकर (वय २५), आदित्य दीपक तेली (वय २४), रणजित प्रल्हाद शेडगे (वय २२, तिघेही रा. विद्यानगर, चिंचवड) तसेच एक अनोळखी इसम यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी गंभीर जखमी झालेल्या २५ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण आणि त्याची पत्नी हे दोघेही वेगवेगळ्या दुचाकीवरून जात होते. फिर्यादी त्याच्या पत्नीला मोरवाडी, पिंपरी येथे कामावर सोडायला जात होता. त्यावेळी विद्यानगर येथील पदमसी बाबर चौकाजवळ आरोपी संतोष कळसकर याने फिर्यादी तरुणाला थांबविले. मला तुझ्या बरोबर बोलायचे आहे, असे सांगून आरोपी संतोष कळसकर याने फिर्यादी तरुणाला वाॅशिंग सेटरच्या पाठीमागील बाजूस नेले. मी तुला त्या तरुणीसोबत लग्न करू नको, मला तिच्याबरोबर लग्न करायचे होते, हे तुला सांगूनही तू माझे ऐकले नाही. तू तिच्यावर चिडचिड का करतो, असे आराेपी कळसकर हा फिर्यादीला म्हणाला. त्यानंतर फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण करून कोयत्याने वार केले.

तेव्हा फिर्यादी त्याच्या तावडीतून निसटून परशुराम चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याने पळू लागला. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या डोक्यावर दोन्ही हातावर, पाठीवर, छातीवर कोयत्याने व लोखंडी सत्तूरने वार करून गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश लोंढे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीchinchwad-acचिंचवडpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड