शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळे गुरव येथील पवना नदीत तरुण बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 21:15 IST

पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकालगतच्या बौध्द विहाराजवळील घाटावर त्याने नदीत उडी मारली.

सांगवी : पवना नदीत उडी मारल्याने एक तरुण बुडाला. अग्निशामक दलाच्या पथकांनी शोध घेतला. मात्र अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. पिंपळे गुरव येथे मंगळवारी (दि. ९) दुपारी साडेचारला ही घटना घडली.प्राथमिक माहितीनुसार, शुभम येडे (वय २३, रा. रहाटणी, असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. शुभम हिंजवडीतील एका कंपनीत नोकरी करतो. ह्यह्यमी घरी येत आहे,ह्णह्ण असे शुभमने मंगळवारी दुपारी दोनला त्याच्या कुटुंबीयांना फोन करून सांगितले. मात्र तो घरी आलाच नाही. तो नदीत बुडाला असल्याची माहिती पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांनी दिली. पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकालगतच्या बौध्द विहाराजवळील घाटावर शुभम मंगळवारी दुपारी आला. तेथे त्याने नदीत उडी मारली. हा प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि महापालिकेच्या अग्निशामक दलाचे दोन पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच शुभमचे कुटुंबीय देखील तेथे आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी सायंकाळी उशिरापर्यंत शुभमचा शोध घेतला. मात्र मिळून आला नाही. अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. बुधवारी सकाळी शोधकार्य सुरू करण्यात येईल, असे अग्निशामक दलातर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :pimpale guravपिंपळेगुरवDeathमृत्यूriverनदी