शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

यमुनानगर, प्राधिकरण : मकर संक्रांती सोहळ्याला ‘सखीं’ची विक्रमी उपस्थिती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 02:58 IST

मकर संक्रांती म्हणजे तिळगुळाच्या रूपाने आपल्या माणसांमध्ये, नातेवाइकांमध्ये गोडवा आणणारा सण. गुलाबी रम्य सायंकाळ, लाल-पिवळ्या रंगांच्या साड्या परिधान करुन आलेल्या सखी, संक्रांतीचे वाण लुटत प्रत्यय देणारा महिलाशक्तीचा माहौल अशा उत्साही वातावरणात सखींनी मैफलीसह संक्रांतोत्सव अनुभवला.

पिंपरी - मकर संक्रांती म्हणजे तिळगुळाच्या रूपाने आपल्या माणसांमध्ये, नातेवाइकांमध्ये गोडवा आणणारा सण. गुलाबी रम्य सायंकाळ, लाल-पिवळ्या रंगांच्या साड्या परिधान करुन आलेल्या सखी, संक्रांतीचे वाण लुटत प्रत्यय देणारा महिलाशक्तीचा माहौल अशा उत्साही वातावरणात सखींनी मैफलीसह संक्रांतोत्सव अनुभवला. निमित्त होते लोकमत सखी मंच व स्टार प्रवाह आयोजित ‘मकर संक्रांती सोहळ्या’चे. यमुनानगर, निगडी येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथे हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला सखींनी विक्रमी संख्येने उपस्थिती लावली. सोहळ्याचे सहप्रायोजक एस.जे.पी.एल सोनिगरा ज्वेलर्स, चिंचवड स्टेशन व प्रा. उत्तम केंदळे फाउंडेशन यमुनानगर हे होते.हळदी-कुंकू हे सौभाग्याप्रमाणेच पत्नीच्या पतीवरील प्रेमाचेही प्रतीक आहे. हळदी-कुंकू समारंभामध्ये प्रेम आणि आपुलकीची भावना असते. हळदी-कुंकू ही महाराष्टÑाची संस्कृती आहे. स्टार प्रवाहने आपल्या मालिकांमधून महाराष्टÑाच्या विविधरंगी संस्कृतीचे दर्शन घडविले आहे. स्टार प्रवाहची ‘नकळत सारे घडले’ ही मालिका परंपरा पुढे नेणारी आहे. या हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘लेक माझी लाडकी’मधील कलाकार स्मिता सरोदे, अविनाश नारकर यांच्या उपस्थितीमुळे चैतन्य पसरले. दुपारी चार वाजल्यापासूनच सखींची सभागृहामध्ये गर्दी झाली होती. प्रत्येक सखीचे प्रवेशद्वाराजवळच हळदी-कुंकू, तिळगूळ, संक्रातीचे वाण देऊन स्वागत केले.सुरुवातीला लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सोहळ्याचे साई आयुर्वेदिक केंद्राच्या संचालिका डॉ. विद्या देवरे, एसजेपीएल सोनिगरा ज्वेलर्स चिंचवड स्टेशनचे राहुल सोनिगरा, नगरसेवक उत्तम केंदळे, महेश शुगर अ‍ॅण्ड पॉवर इंडस्ट्रिजचे मार्केटिंग मॅनेजर उमेश बागडी, गायत्री पैठणीचे अमोल रोडे, डायनॅमिक डिस्ट्रिब्युटरचे अंकुर मपारा, नगरसेविका कमल घोलप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले. स्मिता सरोदे व अविनाश नारकर यांच्याशी सखींनी संवाद साधला. मकर संक्रांती फॅशन शो स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये सखी काळी साडी नेसून, हलव्याचे दागिने परिधान करून सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेत निशा परमार यांनी प्रथम क्रमांक, कल्पना घागे यांनी द्वितीय, पूनम चौधरी यांनी तृतीय, अनिता नहार यांनी चतुर्थ तर शारदा राऊत यांनी पाचवा क्रमांक पटकाविला. परीक्षण सुप्रिया ताम्हाणे, जुही सुहास यांनी केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते लोकमत सखी मंच २०१८च्या ओळखपत्राचे अनावरण केले. सूत्रसंचालन शुभांगी शिंदे यांनी केले. शेखर कुमार प्रस्तुत सखीसाठी एक मिनिट गेम शो झाला. उपस्थित सखींनी शेखर कुमार यांच्याबरोबर नाचून, विविध खेळ खेळून मनमुराद आनंद लुटला. प्रसंगी भरपूर बक्षिसांचे वाटप केले.विजेत्या : रश्मी गिंडे (प्रथम), छाया भुजाडे (द्वितीय), विद्या शिंदे (तृतीय), ममता कदम, निता कोतकर, अनिता शिंदे (उत्तेजनार्थ). या प्रसंगी लोकमत सखी मंच २०१८च्या नोंदणीची माहिती दिली.- स्मिता सरोदे आणि अविनाश नारकर यांच्याबरोबर सखींनी फॅशन वॉकचा आनंद लुटला.- सखींसाठी मकर सक्रांती फॅशन शोचे आयोजन केले होते. यामध्ये सखी काळी साडी नेसून, हलव्याचे दागिने परिधान करून सहभागी झाल्या होत्या.- सखींनी या वेळी विविध फेºयांमध्ये पतीचे मन रिझवण्यासाठी गाणी, नृत्य, अभिनय सादर केला. तर पती रूसल्यावर पतीला मनविण्यासाठी काय करतो हे गुपित उलगडले.- लेक माझी लाडकीमधील स्मिता सरोदे आणि अविनाश नारकर यांनी मालिकेतील विविध पैलू आणि खºया आयुष्यातील प्रसंग अगदी विनोदी शैलीत सांगितले.शतदा प्रेम करावेप्रेमाला कसलीही मर्यादा नाही, हे सांगणारी स्टार प्रवाहवर शतदा प्रेम करावे ही मालिका २९ जानेवारी पासून सुरू होणार आहे. सायली आणि उन्मेषच्या प्रेमाची कहाणी ही मालिका उलगडून दाखवणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडLokmat Eventलोकमत इव्हेंटPuneपुणे