कामगार मंडळातर्फे भजन स्पर्धा, 18 महिला संघांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 02:20 AM2018-10-06T02:20:57+5:302018-10-06T02:21:37+5:30

महात्मा गांधी सप्ताह : अठरा महिला संघांचा सहभाग

Workshop organized by the Labor Board, 18 women teams participate | कामगार मंडळातर्फे भजन स्पर्धा, 18 महिला संघांचा सहभाग

कामगार मंडळातर्फे भजन स्पर्धा, 18 महिला संघांचा सहभाग

googlenewsNext

पिंपरी : कामगार कल्याण मंडळाच्या पुणे गट कार्यालयातर्फे महात्मा गांधी कार्यस्मृती सप्ताहानिमित्त आयोजित भजन स्पर्धेचे उद्घाटन हिंदुस्थान अ‍ॅण्टिबायोटिक्स (एचए) कंपनीच्या कामगार संघटनेचे सचिव सुनील पाटसकर व उपाध्यक्ष अरुण बोºहाडे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.
कामगार कल्याण मंडळातर्फे महिला व पुरुष विभागासाठी शुक्रवारी व शनिवारी (दि. ७) भजन स्पर्धेचे आयोजन एचए कंपनीच्या आवारातील विठ्ठल मंदिरात करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी महिला विभागाच्या स्पर्धा झाल्या. या वेळी महिला कामगारांचे १८ संघ सहभागी झाले होते. या वेळी हभप निवृत्ती धाबेकर, ज्ञानेश्वर इटकर, स्नेहल कुलकर्णी, गुणवंत कामगार ज्ञानेश्वर कातोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पारितोषिकांचे शनिवारी वितरण
भजन स्पर्धेचे पारितोषिक वितरण महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता एचए कॉलनीतील विठ्ठल मंदिराच्या सभागृहात होणार आहे. हभप पुरुषोत्तम महाराज पाटील-आळंदीकर हे अध्यक्षस्थानी असतील. कामगार नेते यशवंत भोसले, ‘एचए’च्या व्यवस्थापकीय संचालिका निरजा सराफ, ‘लोकमत’चे हणमंत पाटील, सुनील पाटसकर व अरुण बोºहाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रभारी सहायक कल्याण आयुक्त समाधान भोसले यांनी दिली.

Web Title: Workshop organized by the Labor Board, 18 women teams participate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.