शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अग्नितांडव : थेरगावच्या आगीत जळाल्या कामगारांच्या झोपड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 21:35 IST

थेरगाव गावठाणातील तापकीरनगर रोडला शनिमंदिरामागे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ ठेवलेल्या पीव्हीसी पाइपला अचानक आग लागली. आग इतकी मोठी होती की, परिसरात जणू अग्नितांडव सुरू असल्याचे भासत होते. या घटनेत कामगारांच्या झोपड्या जळाल्या, असल्या तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

थेरगाव : थेरगाव गावठाणातील तापकीरनगर रोडला शनिमंदिरामागे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ ठेवलेल्या पीव्हीसी पाइपला अचानक आग लागली. आग इतकी मोठी होती की, परिसरात जणू अग्नितांडव सुरू असल्याचे भासत होते. या घटनेत कामगारांच्या झोपड्या जळाल्या, असल्या तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिकांनी अग्निशामक दलाशी संपर्क साधल्यानंतर दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. वर्षभरापासून थेरगाव येथे पिण्याच्या पाण्यासाठी नवीन वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. ६० टक्के काम पूर्ण झालेले असून, राहिलेले ४० टक्के कामाचे पाइप पाण्याच्या टाकीशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत ठेवण्यात आले होते. या ठिकाणी अचानक आग लागून मोठा भडका उडाला. त्यामुळे काही काळ परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. आगीमध्ये पीव्हीसी पाइप जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगीची तीव्रता इतकी होती की, धुराच्या लोटांनी पाण्याची टाकी काळवंडली. धुराचे लोट या आदळल्याने पाण्याची टाकी गरम होऊन त्यातून पाणी पाझरू लागले. जलवाहिनी टाकण्याचे काम संथ गतीने होत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. काम वेळेत पार पडले असते, तर आज ही दुर्घटना घडली नसती, अशी खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली.

चार झोपड्या  खाक जलवाहिनीचे काम करणाºया कामगारांची कुटुंबे या पाण्याच्या टाकीजवळ वास्तव्यास आहेत. त्यांच्या आठ ते दहा झोपड्या येथे आहेत. आग या झोपड्यांपर्यंत पोहचली आणि ३-४ झोपड्या खाक झाल्या. मात्र सुदैवाने या वेळी झोपडीजवळ कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही आगीमुळे दुखापत झाली नाही.

टॅग्स :fireआगThergaonथेरगाव