शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कमानीच्या कामामुळे रस्ता झाला अरुंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:33 IST

वाहनचालक त्रस्त : तळवडे येथील सॉफ्टवेअर चौकातील समस्या

तळवडे : येथील सॉफ्टवेअर चौकात कमानीचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्याच्या मधोमध व दोन्ही बाजूंच्या पादचारी मार्गावर खड्डे खोदण्यात आले आहेत. रस्त्यावर मुरमाचा ढीग लावण्यात आला असल्याने मार्ग अरुंद झाला आहे. पादचाऱ्यांनाचालण्यासाठी पदपथ नसल्यामुळे जीव धोक्यात घालून रस्त्यावर चालावे लागत आहे. नियोजनशून्य कारभाराचा फटका प्रवाशांना आणि वाहनचालकांना बसत असल्याच्या तक्रारी होत आहेत.

तळवडे येथील तंत्रज्ञान औद्योगिक उद्यान असून, या ठिकाणी पिंपरी-चिंचवड, तसेच पुणे शहरातून जवळपास २० हजार संगणक अभियंते येतात. सॉफ्टवेअर चौकात कमानीचे काम एमआयडीसीतर्फे करण्यात येत आहे. त्यासाठी चार दिवसांपासून खोदकाम केले आहे. त्यानंतर सदर कामात कोणतीही प्रगती नाही.कमानीसाठी खोदण्यात आलेल्या या खड्ड्यांमुळे येथील वाहतूककोंडीत भर पडली आहे. आयटी अभियंत्यांना कामावर पोहचण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी आयटी कंपन्या करीत आहेत. हे काम सुरु करताना वाहतुकीला व प्रवाशांना अडथळा होणार नाही, याची दक्षता घेणे अपेक्षित असताना तसा कोणताही विचार केलेला नाही. त्यामुळे वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.राज्यभरात औद्योगिक वसाहतींना प्रवेशद्वार बनविण्याची कामे सुरू आहेत. त्याच कामांतर्गत तळवडेत प्रवेशद्वार बनविण्याचे काम सुरू केले आहे. खड्ड्यात त्वरित काँक्रिट करून मुरुम टाकून बुजविण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. पादचाºयांसाठी लवकरच पर्यायी सुविधा केली जाईल. काम करताना वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल.- गणेश रेड्डी, सहायक अभियंता, एमआयडीसीकमानीचे काम करणार असल्याबाबत कंपन्यांना कल्पना देणे अपेक्षित होते. त्यांच्याशी सल्लामसलत केली नाही. काम करत असताना होणाºया वाहतूककोंडीचा विचार केला नाही. सॉफ्टवेअर कर्मचारी व इतर प्रवाशांना यामुळे त्रास होत असल्याने सुटीच्या कालावधीत करण्यासाठी कामाची पुनर्आखणी करावी, वाहतूककोंडी टाळण्याची दक्षता एमआयडीसी व ठेकेदारांनी घ्यावी.- जयंत कोंडे, प्रशासकीय व्यवस्थापक, सिंटेल, तळवडे

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेroad safetyरस्ते सुरक्षा