शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

संवाद शब्दांचा शब्दांशी, प्रेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात झाला कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 16:41 IST

कॅप एज्युकेशन सोसायटीच्या निगडी येथे प्रेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या संवाद शब्दांचा शब्दांशी या कार्यक्रम झाला.

पिंपरी - कॅप एज्युकेशन सोसायटीच्या निगडी येथे प्रेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या संवाद शब्दांचा शब्दांशी या कार्यक्रम झाला. ‘सृष्टीतील फुले कोमेजतात, शब्द  कोमेजत नाहीत. शब्द आपली जन्मभर सोबत करतात. शब्द जितका महत्वाचा तितका तितकाच त्याचा वापरही महत्वाचा असतो. शब्दाचा वापर योग्य झाला तर ठिक अन्यथा चुकीचा वापर झाल्यास अडचणी वाढू शकतात,  असे मत शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले यांनी व्यक्त केले. कॅप एज्युकेशन सोसायटीच्या निगडी येथे प्रेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या संवाद शब्दांचा शब्दांशी या कार्यक्रमात ते बोलत होते.  याप्रसंगी शब्दांगण वसईच्या अध्यक्षा शिल्पा परुळेकर, प्राचार्या शुभांगी इथापे, उपप्राचार्या छाया लोळे, पर्यवेक्षिका निशा देशमुख, लेखिका डॉ. वसुधा वैद्य, कवि व गीतकार संजय पाटील, विलास चाचे, कथालेखिका संध्या सोंडे कवयित्री अपर्णा बन्नगरे, वैशाली भालेकर, शानुदा पंडीत आदी उपस्थित होते. शिल्पा परुळेकर म्हणाल्या, ‘‘वाचनाने मनुष्य घडतो. कमी शब्दांत व्यक्त व्हायचे असेल तर कवितेसारखे दुसरे साधन नाही.या उपक्रमातून दहा हात जरी लिहिते झाले तरी हा कार्यक्रम सफल झाला असे म्हणता येईल.’’वसुधा वैद्य यांनी कवितेचे नवरसाचे महत्व सांगत रसग्रहण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. कवितेत दडलेल्या भावाशी एकरूप झाले तरच कवितेचा रसास्वाद घेता येतो. संध्या सोंडे म्हणाल्या, साहित्यामध्ये समाजमनाचे प्रतिबिंब दडलेले असते. कथा, कविता, नाटक वाचल्याने सामाजिक जाणीवा विकसित होतात.’’ विलास चाचे व अपर्णा बन्नगरे यांनी साहित्यातील शब्दांचे खेळ घेत,अनेक प्रश्न विचारुन मुलांना बोलते करत पाठ्यपुस्तकातील व अवांतर वाचनाची उजळणी घेतली. अचूक उत्तरे सांगतील त्यांना बक्षीसे दिली. कवि संजय पाटील यांनी लोकगीते सादर करीत कविता सुरात वाचली. ती अधिक चांगली लक्षात राहते, असे सांगितले. वैशाली भालेकर, शानुदा पंडीत, साधना सपाटे, हेरंब पायगुडे यांनीही रचना सादर केल्या. मुलांनी कथा, कविता, गाणी यांचा भरपूर आनंद घेतला. प्राचार्या इथापे म्हणाल्या,‘‘मुलांच्या मनात साहित्याची गोडी निर्माण होण्यासाठी हा उपक्रम होता.’’संजय कु-हाडे यांनी  सूत्रसंचालन, साधना सपाटे यांनी आभार मानले. माधव भुस्कुटे, किरण बेंद्रे, राजेंद्र खेडकर,अमित पंडित यांनी विशेष परीश्रम घेतले.