शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘खाकी वर्दी' ची धुरा सांभाळत ‘ती’ने साधला ‘नेम’; पोलीस नाईक रश्मी धावडेची प्रेरणादायी गाथा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 14:42 IST

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलाच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा...

पिंपरी : शालेय विद्यार्थी असतानाच नेमबाजीची ओढ लागली. त्यात पारंगत होऊन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून पोलीस नाईक रश्मी स्वप्नील धावडे यांनी पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. कुटुंबासह ‘खाकी’ वर्दीची जबाबदारी सांभाळत त्यांनी खेळाचा ‘नेम’ साधला आहे.

रश्मी धावडे या मूळच्या थेरगाव येथील आहेत. त्यांचे सासर भोसरी येथील आहे. विज्ञान शाखेच्या पदवीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत असताना पोलीस शिपाई म्हणून २००७ मध्ये त्या पुणे शहर पोलीस दलात दाखल झाल्या. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले तेव्हा त्या पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात रुजू झाल्या. पिस्तूल नेमबाजीमध्ये त्यांनी २००९ पासून पोलीस संघाकडून विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. गन फाॅर ग्लोरी प्री नॅशनल या राष्ट्रीय स्तरावरील २०१५ मध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांनी राैप्य पदक मिळवले. २०१२ मध्ये गरोदर असताना रश्मी यांनी पंजाबमधील जालंधर येथे झालेल्या ऑल इंडिया पोलीस शुटिंग चॅम्पियनशिप या स्पर्धेत सहभाग घेत चमकदार कामगिरी केली होती. बालेवाडी येथे २०१९ मध्ये ऑल इंडिया पोलीस शुटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सांघिक गटातून कांस्य पदक पटकावले. तसेच वैयक्तिक गटातून चाैथा क्रमांक मिळवला होता.

कोरोनावर मात, शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सरावरश्मी यांचे पती स्वप्नील धावडे हे बाॅक्सर असून, संरक्षणदलातून निवृत्त झाले आहेत. गेल्या वर्षी जुलै व ऑग़स्टमध्ये रश्मी यांना कोराना विषाणूंचा संसर्ग झाल्याने सव्वा महिना रुग्णालयात दाखल होत्या. दरम्यान गर्भाशयाची शस्त्रक्रियाही झाली. या आजारपणामुळे आता खेळता येणार नाही, अशी रश्मी यांची मानसिकता झाली होती. मात्र पती स्वप्नीन यांनी त्यांना मानसिक आधार दिला. त्यामुळे खुल्या विभागीय तसेच खुल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी रश्मी यांनी सराव सुरू केला आहे. स्पर्धा व सरावादरम्यान त्यांच्या आठ वर्षांच्या मुलीचा सांभाळ स्वप्नील यांना करावा लागतो. 

महिलेने बाळाला जन्माला घालणे म्हणजे त्याला जीवन देणे होय. जीवन देऊ शकतो म्हणजे आपल्यात ताकद आहे. त्याची ओळख महिलांना होणे आवश्यक आहे. प्रत्येक महिलेने आपल्या क्षमता ओळखून पुढे आले पाहिजे. महिला पोलीस खेळाडू म्हणून मला मोठा पल्ला गाठायचा आहे. - रश्मी धावडे, पोलीस नाईक, विशेष शाखा, पोलीस आयुक्तालय, चिंचवड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसShootingगोळीबारWomen's Day Specialजागतिक महिला दिन