महिला बीट निरीक्षकास धक्काबुक्की

By Admin | Updated: June 22, 2016 00:42 IST2016-06-22T00:42:16+5:302016-06-22T00:42:16+5:30

चिखली, जाधववाडी येथील बोल्हाईचा मळा येथे अनधिकृत बांधकामधारकांना नोटीस बजावण्यास गेलेल्या महापालिकेच्या महिला बीट निरीक्षकाला मंगळवारी धक्काबुक्की झाल्याची घटना घडली

Women Beat Inspector Pushing | महिला बीट निरीक्षकास धक्काबुक्की

महिला बीट निरीक्षकास धक्काबुक्की

चिखली : चिखली, जाधववाडी येथील बोल्हाईचा मळा येथे अनधिकृत बांधकामधारकांना नोटीस बजावण्यास गेलेल्या महापालिकेच्या महिला बीट निरीक्षकाला मंगळवारी धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. ही घटना घडल्यानंतर कर्मचाऱ्यांनी काही काळ काम बंद आंदोलनाने निषेध नोंदवला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बांधकामधारकाविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.
बोल्हाईचा मळा येथे नीलेश जाधव यांचे अनधिकृत बांधकाम सुरू आहे. या प्रकरणी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील महिला कर्मचारी मंगळवारी सकाळी त्यांना नोटीस देण्यासाठी गेल्या. जाधव यांनी नोटीस घेण्यास नकार दिला.
नोटीस घेण्यास नकार दिल्याने त्यांनी घरावर नोटीस चिटकवून फोटो काढला. नोटीस घेण्यास नकार दिल्यानंतरही ती घरावर चिटकविल्याचा जाधव यांना राग आला. त्यांनी बीट निरीक्षकांबरोबर हुज्जत घातली. त्यांच्यात वादंग झाला.
बीट निरीक्षक महिलेस धक्काबुक्की झाल्याची चर्चा आहे. महापालिका मुख्यालयात येऊन त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. या घटनेचे वृत्त समजताच महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागातील कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवला. अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपशहर अभियंता अयुबखान पठाण यांनी अवैध बांधकामांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Women Beat Inspector Pushing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.