चारित्र्याच्या संशयावरून महिलेवर वार

By Admin | Updated: October 15, 2015 00:34 IST2015-10-15T00:34:52+5:302015-10-15T00:34:52+5:30

चारित्र्याच्या संशयावरून महिलेवर वार केल्याची घटना चिंचवडगाव येथे घडली.

Woman on suspicion of character | चारित्र्याच्या संशयावरून महिलेवर वार

चारित्र्याच्या संशयावरून महिलेवर वार

पिंपरी : चारित्र्याच्या संशयावरून महिलेवर वार केल्याची घटना चिंचवडगाव येथे घडली. फिर्यादी अंबिका शांतप्पा पारसे (रा. मोरयानगर, चिंचवडगाव) यांना आरोपी गोपाळ शांताराम पारसे (वय ३२, रा. चिंचवडगाव) याने फिर्यादी महिलेला दारू पिऊन चारित्र्याच्या संशयावरून स्टीलच्या कटरने वार करून जखमी केले. या प्रकरणी आरोपीविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील भांडणावरून एकास मारहाण
मागील झालेल्या भांडणाच्या कारणावरून एकाला मारहाण केल्याची घटना वाल्हेकरवाडी येथे घडली. फिर्यादी अरविंद कन्हैया मौर्य (रा. चिंचवड) यांच्याकडे काम करणारा मुलगा आकाश हरिजन याला आरोपी महेंद्र सत्यनारायण मौर्य (वय २८, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याने गावाकडील झालेल्या भांडणाच्या कारणावरून मारहाण करू लागला. या वेळी दोघांमध्ये झटापटी झाली. या कारणावरून पुन्हा आरोपी व त्याचा भाऊ दिनेश सत्यनारायण मौर्य या दोघांनी फिर्यादीस बेदम मारहाण केली. (प्रतिनिधी)

Web Title: Woman on suspicion of character