दरोड्यात वृद्ध महिला जखमी

By Admin | Updated: June 2, 2017 02:25 IST2017-06-02T02:25:03+5:302017-06-02T02:25:03+5:30

चऱ्होली, वडमुखवाडी येथे चोरट्यांनी घरात शिरून ९२ हजारांचे दागिने लंपास केले. यामध्ये ६६ वर्षीय वृद्ध महिलेच्या कानातील

Woman injured in dacoity | दरोड्यात वृद्ध महिला जखमी

दरोड्यात वृद्ध महिला जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : चऱ्होली, वडमुखवाडी येथे चोरट्यांनी घरात शिरून ९२ हजारांचे दागिने लंपास केले. यामध्ये ६६ वर्षीय वृद्ध महिलेच्या कानातील दागिने चोरट्यांनी हिसकावून काढले. त्यामुळे त्यांच्या दोन्ही कानाच्या पाळ्या तुटल्या. ही घटना बुधवारी रात्री घडली. सुभद्रा जगन्नाथ तापकीर (वय ६६, रा. वडमुखवडी) असे जखमी महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सुभद्रा यांचा मुलगा आणि नातू घराच्या छतावर झोपले होते. वृद्ध सुभद्रा या घरात झोपल्या होत्या. घरावर पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी या संधीचा गैरफायदा उठविला. चोरट्यांनी घरात शिरून आजीला क्लोरोफार्म लावले. क्लोरोफॉर्ममुळे आजीला गुंगी आली. आजीने आरडोओरडा केला नाही. घरातील कपाटात ठेवलेले दागिने चोरट्यांनी घेतले. सुमारे ९२ हजार किमतीचे साडेआठ तोळे सोने चोरले. त्याच वेळी आजीच्या कानात दिसून आलेली कर्णफुले चोरट्यांनी अक्षरश: ओढून काढली. कानातील दागिने हिसकावताना, आजीच्या दोन्ही कानांच्या पाळ्या फाटल्या. क्लोरोफॉर्ममुळे आजी गुंगीत असल्याने कानाला ईजा झाल्याची तिला जाणीव झाली नाही.
सकाळी आजीच्या दोन्ही कानाच्या पाळ्या फाटल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Woman injured in dacoity