राष्ट्रवादीचीच सत्ता कायम राहणार : विलास लांडे

By Admin | Updated: February 13, 2017 01:52 IST2017-02-13T01:52:52+5:302017-02-13T01:52:52+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसने शहराचा कायापालट केला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवून विजयाची हॅट्ट्रिक

Will the power of NCP continue forever: Vilas Lande | राष्ट्रवादीचीच सत्ता कायम राहणार : विलास लांडे

राष्ट्रवादीचीच सत्ता कायम राहणार : विलास लांडे

भोसरी : राष्ट्रवादी काँग्रेसने शहराचा कायापालट केला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवून विजयाची हॅट्ट्रिक साधणार असून, इंद्रायणीनगर अथवा भोसरी विधानसभा मतदारसंघातच नव्हे, तर शहरातून राष्ट्रवादीचे अधिकाधिक नगरसेवक विजयी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे मत माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केला.
इंद्रायणीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय वाबळे, विक्रांत लांडे, सोनाली उदावंत, सविता झोंबाडे यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेमध्ये लांडे यांनी हा विश्वास व्यक्त केला. लांडे म्हणाले, ‘‘सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे आणि त्यांना राजकारणात संधी देण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे. आमचा सर्वांत सामान्य कार्यकर्ताही महापालिकेत नगरसेवक म्हणून आम्ही पाठविला आहे. या सर्वांचा विजय निश्चित असून विकास कामांसाठी राष्ट्रवादीला साथ द्या.’’
बालाजीनगर येथील सभेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीपान झोंबाडे म्हणाले, गेल्या दहा वर्षांतील विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या पॅनलला विजयी करा. या वेळी बोलताना संजय वाबळे म्हणाले, बहुजनांच्या विकासाला नेहमीच आम्ही प्राधान्य दिले आहे. (वार्ताहर)

Web Title: Will the power of NCP continue forever: Vilas Lande