चुकीची कामे खपवून घेणार नाही! पिंपरी-चिंचवडच्या कामांसाठी पालकमंत्री ‘ॲक्शन मोड’मध्ये

By श्रीनिवास नागे | Published: October 14, 2023 02:52 PM2023-10-14T14:52:56+5:302023-10-14T14:53:07+5:30

कीच्या कामांना मी कधीच थारा दिलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले....

Will not tolerate wrongdoing! Guardian Minister in 'action mode' for Pimpri-Chinchwad works | चुकीची कामे खपवून घेणार नाही! पिंपरी-चिंचवडच्या कामांसाठी पालकमंत्री ‘ॲक्शन मोड’मध्ये

चुकीची कामे खपवून घेणार नाही! पिंपरी-चिंचवडच्या कामांसाठी पालकमंत्री ‘ॲक्शन मोड’मध्ये

पिंपरी :पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याची आग्रही भूमिका घेत प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. रखडलेली कामे मार्गी लावताना कोणतीही चुकीची कामे खपवून घेतली जाणार नाहीत. चुकीच्या कामांना मी कधीच थारा दिलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री म्हणून पवार यांनी शुक्रवारी सूत्रे स्वीकारली. यानंतर शनिवारी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महापालिका आयुक्त विकास कुमार, आमदार आण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतली.

पवार यांनी शहरातील प्रमुख प्रकल्पांची स्थिती, प्रलंबित विकासकामे, पाणीटंचाई, ड्रेनेज व वाहतुकीच्या समस्या, स्वच्छता यासह विविध विषयांची माहिती घेऊन चर्चा केली. प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले. 
ते म्हणाले की, पिंपरी-चिंचवडची रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावताना कोणतीही चुकीची कामे खपवून घेतली जाणार नाहीत. चुकीच्या कामांना मी कधीच थारा दिलेला नाही. शहराच्या भविष्याचा विचार करून विकासकामांचे नियोजन करा.

Web Title: Will not tolerate wrongdoing! Guardian Minister in 'action mode' for Pimpri-Chinchwad works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.