घुले, खुळे यांचे सदस्यत्व रद्द होणार?
By Admin | Updated: June 16, 2016 04:25 IST2016-06-16T04:25:14+5:302016-06-16T04:25:14+5:30
राष्ट्रवादी काँगे्रसमधून भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे शिक्षण मंडळाचे सभापती माजी सभापती व विद्यमान सदस्य चेतन घुले आणि सदस्य सविता खुळे यांचे राष्ट्रवादी काँगे्रसचे सदस्यत्व

घुले, खुळे यांचे सदस्यत्व रद्द होणार?
पिंपरी : राष्ट्रवादी काँगे्रसमधून भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे शिक्षण मंडळाचे सभापती माजी सभापती व विद्यमान सदस्य चेतन घुले आणि सदस्य सविता खुळे यांचे राष्ट्रवादी काँगे्रसचे सदस्यत्व रद्द केले असल्याचे पक्षनेत्या मंगला कदम यांनी त्यांना पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे आता शिक्षण मंडळाचे सदस्यत्व रद्द होणार, की उर्वरित कार्यकाल पूर्ण करणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चेतन घुले आणि सविता खुळे यांची २०१२ ते १७ या कालावधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षीय बलाबलानुसार, शिक्षण मंडळ सदस्यपदी नियुक्ती झाली होती. शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रसचे अधिकृत उमेदवार म्हणून ते विजयी झाले.
दरम्यान, या दोघांनी गेल्या महिन्यात भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे दोघांचे राष्ट्रवादीचे सदस्यत्व रद्द करण्यात येत असल्याचे कदम यांनी घुले आणि खुळे यांना पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे आता दोघांचे शिक्षण मंडळ सदस्यत्व रद्द होणार, की पुढील कार्यकाल पूर्ण करणार याबाबत प्रशचिन्ह आहे. (प्रतिनिधी)