शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

दारूच्या पैशांसाठी कामशेतमध्ये पत्नीचा धारदार हत्याराने निर्घृण खून; आरोपी पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 1:20 PM

दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता ते न दिल्याने झालेल्या वादातून चिडून जाऊन पत्नीचा मानेवर धारदार वस्तूने वार करून निर्घृण खून झाल्याची घटना येथील इंद्रायणी कॉलनीत घडली.

ठळक मुद्देकामशेत पोलीस ठाण्यात हिरामण बसप्पा कांबळे याच्या विरोधात गुन्हा नोंदरूच्या नशेत तो आपल्या पत्नीला नेहमीच मारहाण असे करीत

कामशेत : दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता ते न दिल्याने झालेल्या वादातून चिडून जाऊन पत्नीचा मानेवर धारदार वस्तूने वार करून निर्घृण खून झाल्याची घटना येथील इंद्रायणी कॉलनीत घडली. या प्रकारणी कामशेत पोलीस ठाण्यात हिरामण बसप्पा कांबळे याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.रुपाली हिरामण कांबळे (वय ३५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. हिरामण बसप्पा कांबळे, रुपाली हिरामण कांबळे (वय ३५), दोन मुले कुणाल व कुशल (वय १० व ५ वर्ष) हे कुटुंब कामशेत मधील इंद्रायणी कॉलनीत गणपती मंदिराच्या बाजूस रुपाली हिच्या भावाच्या मालकीच्या घरात राहण्यास होते. हिरामण कांबळे हा व्हीपीएस हायस्कूल लोणावळा येथे शिपाई पदावर नोकरीस होता. त्याला दारूचे व्यसन होते. यावरून दारूच्या नशेत तो आपल्या पत्नीला नेहमीच मारहाण करीत असे. दारूसाठी पैसे मागत असे. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि. ११) रोजी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास हिरामण कांबळे याने त्याची पत्नी रुपाली कांबळे हिच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. तिने पैसे दिले नाही त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले याच रागातून हिरामणने पत्नी रुपालीच्या मानेवर डाव्याबाजूस धारधार हत्याराने मारून गंभीर जखमी केले. यात रुपाली मृत्युमुखी पडली असून हिरामण आपली कपड्याची बॅग भरून पळून गेला. या घटनेची माहिती मृत महिलेच्या मोठ्या मुलाने त्याचे मामा सचिन साळवे यांना दिली. कामशेत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या खुनाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे करीत आहेत.

टॅग्स :kamshetकामशेतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड