शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्याचा पाठलाग करणं महिलेच्या जीवावर बेतलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 21:52 IST

समझोत्याच्या बैठकीत वाद झाल्याने पतीने तेथून काढला होता पळ

ठळक मुद्देयाप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

पिंपरी : नवऱ्याचा पाठलाग करताना चक्कर येऊन पडलेल्या महिलेला उपचारासाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान महिलेचा शुक्रवारी (दि. १३) मृत्यू झाला. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पिंपरी पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा भीमराव जोगदंड (वय २५, रा. वाघेरे कॉलनी, पिंपरीगाव) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई विजाबाई आनंद रोकडे (वय ५५, रा. लांडेवाडी, भोसरी) यांच्या जबाबावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आशा जोगदंड आणि त्यांचे पती भीमराव लक्ष्मण जोगदंड (वय ३०, मूळ रा. इंदापूर) यांचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यानंतर ते बारामती येथे रहात होते. मात्र दोन वर्षांपूर्वी ते पिंपरीगावात राहण्यास आले. पती भीमराव जोगदंड पिंपरी येथील एका बटाटा विक्रेत्याकडे हमालीचे काम करतो. आशा व भीमराव या दोघांना मूलबाळ नव्हते. त्यावरून या दोघांमध्ये सातत्योन वाद होत असत. यातून आशा यांनी २४ नोव्हेंबर रोजी पती भीमराव हरविले आहेत, अशी खबर पोलिसांना दिली. मात्र त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी भीमराव पोलिसांपुढे हजर झाले. पती-पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी पतीकडील नातेवाईक त्यांच्या पिंपरी गावातील घरी आले होते. त्यानुसार दि. ७ डिसेंबर रोजी नातेवाईकांसह त्यांची बैठक झाली. मात्र, बैठकीत वाद झाल्याने नातेवाईक व पती भीमराव यांनी तेथून पळ काढला. मला तुमच्या सोबतच रहायचे आहे, तुम्ही मला सोडून जाऊ नका, असे पत्नी आशा यांनी पती भीमराव यांना सांगितले. मात्र भीमराव थांबले नाहीत. त्यांना थांबविण्यासाठी आशा यांनी त्यांचा पायी पाठलाग केला. पिंपरीगावातून त्यांच्या घरापासून शगुन चौकापर्यंत त्या पाठलाग करीत होत्या. त्यावेळी चक्कर येऊन आशा शगुन चौकात रस्त्यात पडल्या. त्यामुळे त्यांना त्यांच्या आई विजाबाई यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घेऊन जात होत्या. तेथे पोहचल्यानंतर आशा यांना रक्ताची उलटी झाली. त्यामुळे पोलीस ठाण्यात न जाता आशा यांना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्या बेशुद्ध झाल्या. तर शुक्रवारी (दि. १३) त्यांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूAccidentअपघात