शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

'येथे बस का थांबवतात...' निगडीत पीएमपीच्या कंडक्टरला बेदम मारहाण

By नारायण बडगुजर | Updated: April 13, 2023 18:29 IST

चारचाकी वाहनचालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला

पिंपरी : येथे बस का थांबवतात, असे बाेलून वाहनचालकाने शिवीगाळ करत पीएमपीएमएल बसच्या कंडक्टरला मारहाण केली. तसेची तुला दाखवतो, अशी धमकीही दिली. निगडी बस स्टँड येथे बुधवारी (दि. १२) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. 

प्रशांत विनायक देवरे (वय ३३, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चारचाकी वाहनचालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवरे हे पीएमपीएमएल बसचे कंडक्टर आहेत. फिर्यादी हे बुधवारी कर्तव्यावर होते. निगडी -भोसरी बसमध्ये कंडक्टर म्हणून फिर्यादी कर्तव्यावर असताना आरोपी वाहनचालक तेथे आला. ए येथे बस का थांबवतात, असे बोलून आरोपीने शिवीगाळ केली. मी डेपो मॅनेजर नाही. तुम्हाला काही अडचण असेल तर डेपो मॅनेजरला भेटा, असे फिर्यादीने सांगितले. याचा राग मनात धरून आरोपीने बसमध्ये येऊन फिर्यादीची काॅलर पकडून फिर्यादीला बसमधून खाली ओढून घेतले. तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुला दाखवतो, अशी धमकीही आरोपीने दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBus DriverबसचालकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी