शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षकास भोसरीत रंगेहाथ पकडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 17:33 IST

पन्नास हजारांची लाच घेणार्‍या भोसरी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकासह पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.नाळे आणि चौधरी यांनी तक्रारदाराकडे पन्नास हजारांची लाच मागितली होती.

पिंपरी : दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करता मदत करण्यासाठी पन्नास हजारांची लाच घेणार्‍या भोसरी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकासह पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ बाजीराव नाळे (वय ४२, रा. केंद्रीय विहार सोसायटी, पांजरपोळ चौक, मोशी), पोलीस हवालदार वैभव नारायण चौधरी (वय ३१, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी ताब्यात घेतलेल्या पोलिसांची नावे आहेत. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात ३६३ कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी नाळे आणि चौधरी यांनी तक्रारदाराकडे पन्नास हजारांची लाच मागितली होती. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचून या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गवळी, पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी ही कारवाई केली. दोन दिवसांपूर्वीच कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्‍या महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती मोरे व शिपाई हर्षल शिवरकर यांना पंधरा हजारांची लाच घेताना  रंगेहाथ पकडले होते. हे प्रकरण ताजे असतानाच शुक्रवारी पुन्हा सहायक निरीक्षकासह हवालदाराने लाच घेतल्याने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस