शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
5
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
6
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
7
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
8
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
9
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
10
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
11
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
12
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
13
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
14
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
15
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
16
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
17
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
18
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
19
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
20
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...

संकेतस्थळ अपडेट होणार कधी? देहूरोड कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष, उपाध्यक्ष नक्की कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 3:03 AM

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील रक्षा संपदा महासंचालनालयाच्या संकेतस्थळावर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची बहुतांश माहिती चुकीची असून, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आठ महिन्यांपूर्वी बदली झालेले अध्यक्ष, चार महिन्यांपूर्वी निवडलेले उपाध्यक्ष, तसेच सात

देहूरोड : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील रक्षा संपदा महासंचालनालयाच्या संकेतस्थळावर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची बहुतांश माहिती चुकीची असून, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आठ महिन्यांपूर्वी बदली झालेले अध्यक्ष, चार महिन्यांपूर्वी निवडलेले उपाध्यक्ष, तसेच सात महिन्यांपूर्वी निवृत्त झालेल्या एका शाळेच्या मुख्याध्यापिका यांची छायाचित्रांसह नावे अद्यापही संकेतस्थळावर झळकत आहे. तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयाची व शाळांची माहिती गेल्या दोन वर्षांपासून बदललेली नाही. संकेतस्थळ ‘अपडेट’ होत नसल्याने बोर्डाची माहिती पाहताना नागरिकांचा संभ्रम होत आहे.देहूरोडसह देशातील ६२ कॅन्टोन्मेंटचा कारभार संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील रक्षा संपदा महासंचालनालयाच्या महानिर्देशकांच्या नियंत्रणाखाली चालत आहे. सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डांची माहिती संबंधित (डीजीडीई. जीओव्ही.इन) संकेतस्थळावर नागरिकांना पाहता येते. या संकेतस्थळावर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची माहिती पाहत असताना नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर सैफ उल इस्लाम खान यांची मार्चच्या अखेरीला बदली झाली असून, त्यांच्याकडून ब्रिगेडियर ओ़ पी़ वैष्णव यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. वीस एप्रिल २०१७ ला झालेल्या मासिक बैठकीत ब्रिगेडियर वैष्णव यांनी अध्यक्षपदाची व गोपनीयतेची शपथ घेतली होती. मात्र, अद्यापही त्यांचे नाव व छायाचित्र रक्षा संपदा विभागाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आलेले नाही. तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी विशाल खंडेलवाल यांची १७ जुलै २०१७ ला निवड झाली असताना अद्यापही खंडेलवाल यांचे छायाचित्र व नाव संकेतस्थळावर दिसत नाही.कॅन्टोन्मेंटच्या प्राथमिक मराठी शाळेतील वरिष्ठ मुख्याध्यापिका पुष्पलता मधुकर शिंदे या ३० एप्रिल २०१७ ला सेवानिवृत्त झाल्या आहेत. तरीदेखील आजतागायत शिंदे यांचे नावासह छायाचित्र संबंधित संकेतस्थळावर झळकत आहे. तसेच बोर्डाच्या शाळांतील विद्यार्थी व शिक्षक आकडेवारी दोन वर्षांत अपडेट केलेली नसल्याचे दिसत आहे.अनेक चुका : प्रशासनाचे होतेय दुर्लक्षसंकेतस्थळावर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या इतर माहितीतही अनेक चुका आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड स्थापनेची तारीख दिलेली नाही. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना एमएससीआयटी हा कोर्स शिकविला जातो, अशी माहिती दिली आहे. हे अद्याप बोर्डाच्या शाळांत सुरू झालेले नाही. संकेतस्थळावर मुख्य कार्यकारी अधिकारी सानप यांना तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी टी. एम. वाकचौरे यांना बोर्डाकडून देण्यात आलेला मोबाइल क्रमांक बदलण्यात आलेला नाही.चुकीची माहिती, नावे, छायचित्रे आदींबाबतीत बोर्ड प्रशासनाने संबंधित विभागाला तातडीने त्यांची चूक निदर्शनास आणून द्यावी़ तसेच नागरिकांचा संभ्रम दूर करण्यासाठी योग्य माहिती व छायचित्र प्रसिद्ध करणेबाबत कळवावे, अशी मागणी जागरूक नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड