शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

असुविधांची लागण थांबणार कधी? रुग्णांच्या नातेवाइकांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 04:16 IST

महापालिकेकडून नागरिकांच्या सोईसाठी शहरात आठ मोठी रुग्णालये सुरू केली आहेत. मात्र, या रुग्णालयातील असुविधांमुळे रुग्णांना वायसीएमशिवाय पर्यायच उरत नाही. दिवसेंदिवस रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वायसीएममधील यंत्रणेवर ताण येत आहे.

पिंपरी : महापालिकेकडून नागरिकांच्या सोईसाठी शहरात आठ मोठी रुग्णालये सुरू केली आहेत. मात्र, या रुग्णालयातील असुविधांमुळे रुग्णांना वायसीएमशिवाय पर्यायच उरत नाही. दिवसेंदिवस रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वायसीएममधील यंत्रणेवर ताण येत आहे. याचाच प्रतिकूल परिणाम रुग्णांच्या उपचारावर होत आहे. रुग्णालय परिसरातील स्वच्छतेकडेही कर्मचा-यांचे दुर्लक्ष आहे.महापालिकेच्या अर्थसंकल्पात वर्षाकाठी सुमारे ३० कोटींहून अधिक रुपयांची तरतूद यशवंतराव रुग्णालयासाठी केली जाते. मात्र, या रुपयांचा उपयोग रुग्णांना योग्य सेवा देण्यासाठी व्हावा, अशी शहरवासीयांची अपेक्षा असते. मात्र, अनावश्यक उपकरणांची सातत्याने होणारी खरेदी तसेच अत्यावश्यक साधन-सुविधांसाठी होणारी दिरंगाई यामुळे येथे येणाºया रुग्णांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.एक्स-रे मशीन वारंवार नादुरुस्त असल्याने रुग्णांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळतात. शिवाय एक्स-रेसाठी आवश्यक असणाºया फ्रेमही अपुºया असतात. त्यामुळे अनेकवेळा रिपोर्ट मिळण्यास दिरंगाई होते. परिणामी पुढील उपचारास विलंब होतो. अपंग आणि चालता न येणाºया रुग्णांसाठी आवश्यक असणाºया व्हिलचेअरची संख्या कमी असल्याने रुग्णांना ताटकळत बसावे लागत आहे. खाटांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे अनेकवेळा अतिदक्षता विभागासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात रुग्णाला पाठविण्यात येते.रुग्णालयातील स्वच्छतागृहांची स्थिती दयनीय आहे. स्वच्छतेअभावी येथील दुर्गंधी असाह्य होते. शिवाय इमारतीच्या डगमध्ये कचºयाचे साम्राज्य पहायला मिळत आहे.रुग्णालयातून औषधांची दुकानदारीरुग्णाला लिहून दिलेली औैषधे विशिष्ट दुकानातून घेण्याचा आग्रह काही डॉक्टरांकडून केला जातो. तसेच काही महागडी औैषधे रुग्णालयातूनच मिळणे आवश्यक आहे. मात्र ती बाहेरील मेडिकल स्टोअरमधून आणायला सांगितली जातात. वायसीएममध्ये येणाºया बहुतांश रुग्णांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. त्यामुळे अशा रुग्णांना महागडी औैषधे बाहेरून घेणे परवडत नाही. यावरून रुग्णांच्या नातेवाइकांकडून प्रशासनाकडे तक्रारीही केल्या आहेत. तरीही रुग्णालय प्रशासन अशा औैषधांची खरेदी का करत नाही व ठराविक मेडिकलमधून औैषध खरदीचा हट्ट कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.डॉक्टरांवर राजकीय दबावडॉक्टरांवर वारंवार होणाºया हल्ल्याविरोधात येथील निवासी डॉक्टरांनी काही महिन्यांपूर्वी संप पुकारला होता. महापौैरांच्या आश्वासनानंतर संप मागे घेतला खरा; परंतु अद्यापही परिस्थिती ‘जैैसे थे’च आहे. तातडीक विभागात एका रुग्णासोबत आठ ते दहा लोक येतात. अशावेळी नातेवाइकांकडून उपचारासाठी दबाव आणला जातो. शिवाय एखाद्या गंभीर रुग्णावर उपचार होणे येथे शक्य नसल्याचे डॉक्टर सांगतात. तेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांकडून राजकीय पुढाºयांमार्फत उपचार करण्यासाठी दबाव आणला जातो. अशातच संबंधित रुग्ण दगावला तर त्याचे खापर निवासी डॉक्टरांवर फोडले जाते.