कॅन्टोन्मेंटचे संकेतस्थळ अपडेट होणार कधी?

By Admin | Updated: April 26, 2017 03:49 IST2017-04-26T03:49:10+5:302017-04-26T03:49:10+5:30

देहूरोड कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडियर सैफ खान यांची गेल्या महिन्यात बदली झाल्यानंतर यांच्याकडून ब्रिगेडियर ओ़ पी़ वैष्णव यांनी बोर्डाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.

When will the Cantonment website be updated? | कॅन्टोन्मेंटचे संकेतस्थळ अपडेट होणार कधी?

कॅन्टोन्मेंटचे संकेतस्थळ अपडेट होणार कधी?

देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडियर सैफ खान यांची गेल्या महिन्यात बदली झाल्यानंतर यांच्याकडून ब्रिगेडियर ओ़ पी़ वैष्णव यांनी बोर्डाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. मात्र, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या संकेतस्थळावर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष म्हणून ब्रिगेडियर खान यांचे नाव व छायाचित्र झळकत असल्याचे दिसत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर सैफ खान यांची बदली झाल्याने त्यांनी नूतन अध्यक्ष ब्रिगेडियर ओ़ पी़ वैष्णव यांच्याकडे गेल्या महिन्यात २९ एप्रिल २०१७ रोजी अध्यक्षपदाचा पदभार सुपूर्त केला होता. त्यानंतर २० एप्रिलला झालेल्या देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सदस्यपदाची शपथही घेतली आहे. मात्र, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकृत संकेस्थळावर अद्यापही सैफ खान यांचे नाव व छायाचित्र झळकत आहे. तसेच झेंडेमळा येथील संत तुकाराममहाराज विद्यामंदिर या प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याधापक निवृत्त झाले असून, शिक्षकाची माहिती संकेतस्थळी देण्यात आलेली नाही. (वार्ताहर)

Web Title: When will the Cantonment website be updated?