चंदूच्या स्वागतासाठी गावी जाणार

By Admin | Updated: January 23, 2017 03:01 IST2017-01-23T03:01:20+5:302017-01-23T03:01:20+5:30

सीमारेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेले भारतीय लष्करातील जवान चंदू चव्हाण हे शनिवारी पुन्हा भारतात परतले. यामुळे

To welcome Chandu in the village will be there | चंदूच्या स्वागतासाठी गावी जाणार

चंदूच्या स्वागतासाठी गावी जाणार

पिंपरी : सीमारेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेले भारतीय लष्करातील जवान चंदू चव्हाण हे शनिवारी पुन्हा भारतात परतले. यामुळे चव्हाण कुटुंबात आनंदाचे वातावरण असून आकुर्डीत वास्तव्यास असणारे चव्हाण यांचे मामा वाल्मिक युवराज पाटील यांनीही ‘लोकमत’शी बोलताना आनंद व्यक्त केला.
चंदू चव्हाण हे सीमारेषेवर तैनात असताना २९ सप्टेंबर २०१६ ला चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. चव्हाण हे धुळ्याचे रहिवासी
असून त्यांचे मामा आकुर्डीतील पांढारकर वस्ती येथे रहायला
आहेत. ‘आम्ही त्याच्या स्वागतासाठी जाणार आहे’, असे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: To welcome Chandu in the village will be there