शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

कोरोना संकट दूर करण्यासाठी श्री म्हातोबा रायाला घालणार साकडे; इतिहासात पहिल्यांदाच उत्सवात खंड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 1:48 PM

मुळशी तालुका, पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येथे जमतात.

ठळक मुद्देइसवी सन १६३५ सालापासून म्हातोबा महाराजांचे वाकड हिंजवडीत अस्तित्व वाकड-हिंजवडी पंचक्रोशीसह पुण्यातील भक्त मुकणार बगाड मिरवणुकीला 

पिंपरी :  आज चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती, वाकड-हिंजवडीसह तमाम मुळशी तालुक्याचे व पुणे जिल्ह्यातील असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री म्हातोबा देवाची प्रसिद्ध बगाड मिरवणूक व यात्रा. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे यात्रा रद्द करण्यात आली असून विधीवत, पूजा-अर्चा करून देशावरील कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी श्री म्हातोबा रायाला साकडे घालणार असल्याचे वाकड-हिंजवडी ग्रामस्थ व उत्सव कमिटीने सांगितले.

तीन दिवसीय उत्सवात बगाड मिरवणूक, दुसऱ्या दिवशी वाकडला काट्याची पालखी मिरवणूक, देवाचा छबिना यांसह दोनही गावात  तमाशा, ऑर्केस्ट्रा, संगीत रजनी अशा भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तिसऱ्या दिवशी निमंत्रित नामवंत मल्लांच्या जंगी कुस्त्यांच्या आखाड्याने सांगता होत असते. मात्र, हे सर्व कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात आले असून ग्रामस्थांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मास्क, सॅनिटायझर वाटप, औषध फवारणी आदींचे आयोजन करून सामाजिक जबाबदारी भान जपले आहे. शेकडो वर्षांपासून सुरु असलेल्या या ऐतिहासिक बगाड मिरवणूकीत पहिल्यांदाच खंड पडला आहे. दरवर्षी हनुमान जयंतीला दुपारी ४ नंतर हिंजवडी गावठाणातून वाकडच्या दिशेने बगाड मिरवणूक निघते. मिरवणूक पाहण्यासाठी व दर्शनासाठी मुळशी तालुका, पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने येथे जमतात.  इसवी सन सोळाशे पस्तीस सालापासून म्हातोबा महाराजांचे वाकड हिंजवडीत अस्तित्व असल्याचे मानले जाते.  महाराजांचे मूळ ठाणे असलेल्या बारपे आडगावच्या (मुळशी) घनदाट जंगलात पायी जाऊन शेलेकरी बगाडाचे लाकूड आणतात. ग्रामस्थांच्या मदतीने पारंपारिक पद्धतीचा वापर करून  बगाडाची उभारणी केली जाते, हिंजवडीत जांभूळकर परिवाराचे मूळ तीन वाडे आहेत. दरवर्षी तीन पैकी एका वाड्यातील विवाहित सदस्याची गळकरी म्हणून निवड केली जाते.गळकर याला हनुमान मंदिरात दर्शनासाठी नेऊन त्याला बगाडावर बसविले जाते. दुपारी साडे चारच्या सुमारास बगाडाच्या मिरवणुकीला हिंजवडी गावठाणातून सुरुवात होते आणि वाकड गावठाणातील म्हातोबा मंदिर परिसरात मिरवणुकीची सांगता होते. 

टॅग्स :wakadवाकडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस