शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यभराची कमाई घरासाठी लावली, घरे पाडल्यानंतर आम्ही जायचे कुठे? नागरिकांचा टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 15:43 IST

चिखलीतील इंद्रायणी नदीकाठच्या नागरिकांचा टाहो, महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर, फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी; दुसऱ्या दाव्याच्या संदर्भात निर्णय; पण भरडले जातोय आम्ही!

पिंपरी : ‘आयुष्यभराची कमाई घर उभारण्यासाठी लावली, आता निळ्या पूररेषेत आहे, असे सांगून त्यावर कारवाई केली जात आहे. आम्ही कोणाला फसवले नाही. आमची फसवणूक झाली आहे. आता, आम्ही जायचे कुठे?’ असा संतप्त सवाल चिखली येथील इंद्रायणी नदीकाठच्या नागरिकांनी केला आहे.

चिखलातील इंद्रायणी नदीकाठच्या घरांवर कारवाई होणार आहे. त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी महापालिका प्रशासनाबद्दल आणि भ्रष्ट व्यवस्थेबद्दल संताप व्यक्त केला. ही कारवाई अन्यायकारक आहे. साहित्य काढण्यासाठी वेळही दिला नाही. शुक्रवारी वीज, पाणी तोडण्यासाठी महापालिका अधिकारी गेले असताना नागरिकांनी माध्यमांसमोर टीका केली. 

पावसात साहित्य हलविण्याची तारांबळ

शनिवारी कारवाई होणार असल्याने पावसातही येथील घरातील साहित्य हलविण्यासाठी धावपळ सुरू होती. नागरिकांनी संताप व्यक्त केला. येथील प्रत्येक माणूस श्रीमंत नाही. गोरगरिबांची फसवणूक झाली आहे, ज्यांनी फसवणूक केली. त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे. आज आमचे घराचे पाणी तोडले, हा अन्याय आहे, आम्ही चुकीचे होतो तर पाच वर्षे प्रशासन झोपले होते का? नदीपात्रातील बांधकामांच्या जागा कुणी विकल्या. तेथे बंगल्यांचे डिझाइन करणारे कोण, त्यांना वीज, पाणी, ड्रेनेजची सुविधा देणारा अधिकारी कोण? याचा शोध घेऊन कारवाई केली पाहिजे, असा संताप महिलांनी व्यक्त केला.

 मी चार वर्षांपूर्वी या ठिकाणी जागा घेतली. त्यावेळी येथे रहिवासी झोन आहे, असे सांगितले होते. त्यानंतर सर्व वीज, पाणी अशा परवानगी घेतल्या. महापालिकेच्या वतीने कर भरून घेतला. आता आमच्या घरांवर कारवाई होत आहे. आमच्या परिसरामध्ये कोणीही भराव टाकून बांधकाम केले नाही. याबद्दल न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवादाची दिशाभूल केली. आमच्यावर अन्याय केला जात आहे. - महेश पाटील, नागरिक गोरगरीब नागरिकांनी या ठिकाणी घरे उभारली आहेत. आता त्या ठिकाणची घर पाडण्याचे आदेश दिले जात आहेत. आम्हाला कोणत्याही प्रकारचा वेळ मिळू न देता महापालिका प्रशासनाच्या वतीने अन्यायकारक कारवाई सुरू आहे. आम्हाला फसवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.  - गणेश खुळे, नागरिक 

२०१८ पासून येथील प्रश्न चर्चेत आला आहे. आमच्या भागातील नागरिकांनी कुठेही चुकीचे काम केले नव्हते. दुसऱ्या दाव्याच्या संदर्भात निर्णय झाला आहे. आमच्या जवळच असणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या संदर्भात न्यायालयाने निर्णय दिला आणि कारवाई आमच्यावरही होत आहे. या भागात आम्ही कोणीही भराव टाकलेला नाही. आमच्या जागा चुकीच्या होत्या, तर मग नोंदणी कशी झाली? आमची फसवणूक झाली आहे. - जयवंत कुदळे, नागरिक 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाReal Estateबांधकाम उद्योग