शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
4
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
5
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
6
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
7
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
8
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
9
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
10
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
11
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
12
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
13
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
14
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
15
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
16
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
17
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
18
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
19
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
20
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत

'भाजपाला गुजरातेत आम्ही रोखू शकलो नाहीत. मात्र महाराष्ट्रात तुम्ही रोखा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 07:39 IST

संविधान दिन सोहळा समिती, पिंपरी चिंचवड शहर व आरडीएएम यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथे भारतीय संविधान जनजागरण अभियान कार्यक्रमाचे आयोजित बुधवारी करण्यात आले होते.

पिंपरी : भाजपाला गुजरातेत आम्ही रोखू शकलो नाहीत. मात्र महाराष्ट्रात तुम्ही रोखा. त्यासाठी सर्व पक्षांनी भाजपाच्या विरोधात एकत्र आले पाहिजे. अन्यथा विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या ८० जागाही येणार नाहीत, असे मत गुजरातमधील आमदार व आरडीएएमचे  राष्ट्रीय अध्यक्ष जिग्नेश मेवाणी यांनी व्यक्त केले.

संविधान दिन सोहळा समिती, पिंपरी चिंचवड शहर व आरडीएएम यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथे भारतीय संविधान जनजागरण अभियान कार्यक्रमाचे आयोजित बुधवारी करण्यात आले होते. या वेळी आमदार मेवाणी बोलत होते. मानव कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, सुलक्षणा शिलवंत धर, मारुती भापकर, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष व नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, डॉ. सुरेश माने आदी या वेळी उपस्थित होते.

आमदार मेवाणी म्हणाले, ‘‘जनतेने सांगितले नाही, मात्र यांनीच महाजनादेश यात्रा काढली आहे. शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत. पिण्याचे पाणी देण्याची यांची औकात नाही. गायीचा मुद्दा पुढे करून महत्त्वाच्या मुद्यांवरून भरकटवले जाते. केवळ एक राष्ट्र व अस्मिता यावरून भावनिक आवाहन करतात.  विविध जातींचे ते केवळ एक पॅकेज आहे. देशातील अस्पृश्यता संपुष्टात येत नाही तोपर्यंत राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही. बाबासाहेबांनी सांगितले आहे की, मनुवाद व पुंजीवाद आपले शत्रू आहेत. सध्या त्यांचे महागठबंधन झाले असून, ते आपल्याला तोडावे लागेल. त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल.’’ 

कोळसे पाटील म्हणाले, ‘‘गुंडांच्या राज्याला मत देणार नाही, याची शपथ एल्गार परिषदेत घेतली. मात्र खोटे खटले भरले. विचारवंतांना आत टाकले. एका समाजात शंभर पक्षाला मानणारे आहेत. त्यामुळे मोदी, शहा यांच्यासारखे लोक निवडून आले. सर्व बहुजन समाज एकत्र येत नाहीत तोपर्यंत आपले राजकारण पासंगाचे आहे. त्यासाठी बहुजन समाज एकत्र आणायचा आहे.’’

‘‘महावीर, बुद्ध, कबीर अशा थोरांचा, महामानवांचा हा देश आहे. मात्र काही जणांकडून रामाचे नाव विकण्यात येत आहे. असे हे नागपूरवाले लोक डरपोक आहेत. हेमंत करकरे यांचा खून करण्यात आला.  अशा शहीद करकरेंना आपण अभिवादन केले पाहिजे.  - जिग्नेश मेवाणी, आमदार, गुजरात

टॅग्स :BJPभाजपाJignesh Mevaniजिग्नेश मेवानी