नियोजनाअभावी चिखलीत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 02:05 IST2018-04-11T02:05:17+5:302018-04-11T02:05:17+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अनागोंदीमुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत आहे. विभागाकडून कृष्णानगर येथील पंप हाऊस येथे दुरुस्तीचे काम सुरू आहे.

Water shortage due to lack of planning | नियोजनाअभावी चिखलीत पाणीटंचाई

नियोजनाअभावी चिखलीत पाणीटंचाई

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अनागोंदीमुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत आहे. विभागाकडून कृष्णानगर येथील पंप हाऊस येथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी चिखली, तळवडे भागात विस्कळीत पुरवठा होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आणि पाण्याचे नियोजन विस्कटल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील एकाही भागात पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कान टोचूनही प्रश्न सुटलेला नाही. जलवाहिन्या फुटून पाणीगळतीचे प्रमाण वाढतच आहे. याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष नाही. कृष्णानगर येथील पंप हाऊसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तेथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण तळवडे भाग, संपूर्ण चिखली भाग, रामनगर, अजंठानगर, विद्यानगर या भागातील पाणीपुरवठा कमी दाबाने व अनियमित राहील. त्याची नागरिकांनी नोंद घ्यावी व पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. बेजबाबदार अधिकाºयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी दररोज ४६० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. वाढत्या नागरीकीकरणामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. पाणी गळतीचे प्रमाण ३० टक्क््यांहून अधिक असल्याने महापालिका प्रशासन गळती रोखण्याचे काम करत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी पाणीटंचाईचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

Web Title: Water shortage due to lack of planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.