शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

पिंपरीत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे पाणी टंचाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:48 PM

आयुक्तांचा प्रशासनावर वचक नाही आणि सत्ताधारी म्हणून आम्ही आयुक्तांवर वचक निर्माण करण्यात कमी पडत आहोत...

ठळक मुद्देमहापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा : सत्ताधारी सदस्यांचा सभात्याग चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील सदस्यांनी निष्क्रिय प्रशासनामुळे पाणी टंचाई

पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समिती सभेत पाणी पश्नावरून वादळी चर्चा झाली. चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील सदस्यांनी निष्क्रिय प्रशासनामुळे पाणी टंचाई होत आहे. पाणीटंचाईला प्रशासनच जबाबदार आहे, असल्याचे जाहिरपणे सांगितले. पाणीपुरठा विभागावर आयुक्तांचा वचक कमी झाला आहे. आणि आमचाही प्रशासनावरील वचक कमी झाला आहे, कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. आयुक्तांचा प्रशासनावर वचक नाही आणि सत्ताधारी म्हणून आम्ही आयुक्तांवर वचक निर्माण करण्यात कमी पडत आहोत. आयुक्त मलई मिळणारी कामे करण्यात दंग आहेत. त्यांना जनतेच्या हिताच्या कामाचे काही देणेघेणे नाही, असे सांगून सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी हतबलता प्रकट करून सभात्याग केला. महापालिकेच्या स्थायी समितीची तहकूब साप्ताहिक सभा आज झाली. स्थायी समितीत पाणी प्रश्न पेटला होता. सुरुवातीला चिंचवड विधानसभा मतदार संघातील नगरसेवक सागर आंगोळकर यांनी पाणी टंचाईवर प्रकाश टाकला. भोसरी विधानसभेतील नगरसेवक विकास डोळस हेही आक्रमक झाले. आंगोळकर म्हणाले, विस्कळीत पाणीपुरवठा, विकास कामे केली जात नाही. सत्ताधारी पक्षात असूनही कामे होत नाहीत. पाणीपुरवठ्यावर आवाज उठविल्यास केवळ चार दिवस पाणी सुरळीत होते. चार दिवसानंतर जैसे थे परिस्थिती असते. आमदार वास्तव्यास आहेत, त्याच परिसरात पाणी पुरवठा होत नसेल तर पिंपळेगुरव परिसरात पाण्याची मोठी टंचाई आहे. तसेच या परिसरात विकास कामे देखील केली जात नाहीत. प्रभागात विकासकामांना ब्रेक लावला जात आहे. प्रशासन आम्हाला चालविता येत नाही. भाजपला बदनाम करण्याची आयुक्तांनी सुपारी घेतली की काय? असा प्रश्न आम्हाला पडला आहे.डोळस म्हणाले, ह्यह्यदिघी-बोपखेल परिसरात नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. चार दिवस पाणी येते, चार दिवस पाणी येत नाही. त्यामुळे दिघी, बोपखेलकर हैराण झाले आहेत.  निवडून आल्यापासून पाणीपुरवठ्याबाबत सातत्याने आवाज उठवित आहे. तरीदेखील प्रशासन त्याकडे गांभीयार्ने पाहत नाही. केवळ पाण्याचे नियोजन केले जात असल्याचे सांगितले जाते. पंरतु, प्रत्यक्षात कारवाई शून्य आहे. निष्क्रिीय अधिकाºयांवरही कारवाई व्हायला हवी.प्रशासन मलईदार कामांत व्यस्त सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांची कामे होत नसल्याबद्दल भाजपा सदस्य डोळस यांनी आयुक्तांवर टीका केली. ते म्हणाले, प्रशासन मलईदार कामे करण्यात दंग आहे. त्यांना जनतेशी निगडीत कामाचे काही देणे घेणे राहिले नाही. आयुक्तांचा प्रशासनावर कसलाही वचक नाही. सत्ताधारी म्हणून आम्ही त्यांच्यावर वचक निर्माण करण्यात कमी पडत आहोत. प्रशासनात सगळा सावळा गोंधळ सुरु असून बजबजपुरी माजली आहे. कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. आयुक्तांच्या निष्क्रियतेमुळेच शहरात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास अधिका-याला घरी बसविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. डोळस आणि आंगोळकर यांनी प्रशासनावर टीका करून सभात्याग केला. त्यानंतर सभा गुंडाळण्यात आली. प्रशासनाच्या वतीने सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रश्नावर कोणताही खुलासा केला नाही.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीcollectorजिल्हाधिकारी