वॉर्डातील कामांना आला जोर

By Admin | Updated: April 15, 2016 03:41 IST2016-04-15T03:41:17+5:302016-04-15T03:41:17+5:30

महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असून, इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. आपल्या वॉर्डातील अधिकाधिक कामे व्हावीत, यासाठी नगरसेवकांची धावपळ

Ward's work got a lot of emphasis | वॉर्डातील कामांना आला जोर

वॉर्डातील कामांना आला जोर

पिंपरी : महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असून, इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. आपल्या वॉर्डातील अधिकाधिक कामे व्हावीत, यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू आहे. त्यामुळे स्थायी पुढेदेखील वॉर्डातील छोट्या कामांचे प्रस्ताव येण्याचे प्रमाण वाढले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता आणण्याची ‘हॅट्ट्रिक’ साधण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसने तयारी आहे. निवडणुकीवेळी नागरिकांसमोर जाताना अडचणी येऊ नये, यासाठी वॉर्डातील अधिकाधिक कामे करण्यास प्राधान्य दिले जात आहे. पेव्हिंग ब्लॉक टाकणे, रस्ते दुरुस्ती, जलवाहिनी दुरुस्ती अशा छोट्या कामांकडेही लक्ष दिले जात आहे. त्यामुळे स्थायी समितीसमोरदेखील सध्या मोठ्या कामांसह अगदी छोट्या कामांचेही प्रस्ताव येण्याचे प्रमाण वाढले आहे. निवडणुकीपूर्वी वॉर्डातील कामे पूर्ण होण्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी जोर लावला आहे. अंदाजपत्रकातही वॉर्डासाठी अधिकाधिक तरतूद करण्यासाठी नगरसेवकांचा आटापिटा पाहायला मिळाला.
पेव्हिंग ब्लॉक आणि गल्लीबोळातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत अनेक ठिकाणी ओरड असते. ही कामे केल्यास नागरिकांशी जोडले जातात. यामुळे नगरसेवकांनी वॉर्डातील छोटी कामे करण्याकडे जोर दिला आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समिती सभेच्या विषयपत्रिकेवरदेखील वॉर्डातील छोट्या-छोट्या कामांशी संबंधित असलेल्या कामांचाच समावेश होता. थेरगावातील लक्ष्मणनगर, गणेशनगर परिसरात नवीन पाइपलाइन टाकणे, प्रभाग क्रमांक चारमधील महात्मा फुलेनगर ते नेवाळे वस्ती येथील रस्त्यांसह कृष्णानगर येथील रस्त्यांचे डांबरीकरण करणे, बोपखेलमधील रस्ते विकसित करणे, अभ्यासिका, व्यायामशाळा व बाह्यरुग्ण विभागातील फर्निचर बनविणे आदी खर्चास मान्यताही दिली. (प्रतिनिधी)

महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेले मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करीत आहेत. यासह सतत संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावरील मेसेज यांचा मारा सुरू आहे. तर नगरसेवकांनी मात्र वॉर्डातील छोटी-छोटी कामे करण्याकडे लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. शिवाय, हे काम आपल्याच माध्यमातून कसे मार्गी लागले, याबाबतही सांगण्याचा प्रयत्न केला जातो. एखादे काम जरी झाले, तरी त्याचे फलकही उभारले जात आहे.
एरवी वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे अनुभव नागरिकांना येतात. तक्रार मांडण्यासाठी नगरसेवकांची भेट होणेही कठीण असते. मात्र, जसजशी निवडणूक जवळ येत आहे, तसतशी नागरिकांच्या तक्रारींची नगरसेवकांकडून तातडीने दखल घेतली जात आहे. वॉर्डातील छोटी कामेदेखील यामुळे मार्गी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Web Title: Ward's work got a lot of emphasis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.