पोलिसांच्या तपासाला कागदपत्रांची प्रतीक्षा

By Admin | Updated: June 22, 2016 00:37 IST2016-06-22T00:37:10+5:302016-06-22T00:37:10+5:30

चिंचवड देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त सुरेंद्र ऊर्फ कुमार देवमहाराज यांच्या आत्महत्येच्या घटनेला पाच महिने उलटून गेले, तरी आत्महत्येमागील नेमके कारण काय असावे, याचे धागेदोरे अद्यापही पोलिसांना

Waiting for the documents to look into the police | पोलिसांच्या तपासाला कागदपत्रांची प्रतीक्षा

पोलिसांच्या तपासाला कागदपत्रांची प्रतीक्षा

पिंपरी : चिंचवड देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त सुरेंद्र ऊर्फ कुमार देवमहाराज यांच्या आत्महत्येच्या घटनेला पाच महिने उलटून गेले, तरी आत्महत्येमागील नेमके कारण काय असावे, याचे धागेदोरे अद्यापही पोलिसांना हाती लागलेले नाहीत. त्यांच्या प्रमुख विश्वस्तपदाच्या काळात ट्रस्टच्या मालकीच्या जमिनीचे जे व्यवहार झाले, त्यातून हा प्रकार घडला असावा का? अशी शक्यता गृहीत धरून धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून ट्रस्टच्या जमीन व्यवहारासंबंधीचे कागदपत्र मिळावेत, असा पत्रव्यवहार पोलिसांनी केला आहे. पोलीस अद्यापही कागदपत्रांच्या प्रतीक्षेत असल्याने तपासाला खीळ बसली आहे.
माहिती अधिकाराचा वापर करून ट्रस्टच्या मालकीच्या जमीन व्यवहाराबाबतची माहिती मागवून देवमहाराज यांना काही कार्यकर्ते त्रास देत होते. माहिती अधिकारांतर्गत त्यांच्या मागे लावलेला ससेमिरा हे त्यांच्या आत्महत्येमागील कारण असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. देवमहाराज
यांच्या आत्महत्येबद्दल विविध तर्क-वितर्क लावले जात होते.
अशातच काही दिवसांनी माहिती अधिकार कार्यकर्ता चव्हाण
याने आत्महत्या केली. देवस्थान ट्रस्टच्या मालमत्ता व्यवहारासंबंधीची माहिती मागविणारे अर्ज ज्यांनी दिले, त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Waiting for the documents to look into the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.