शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

वाघोली योजनेचे पाणी मिळणार नाही; पिंपरी पालिकेची मागणी पुणे पालिकेने फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 15:20 IST

पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजुर कोट्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेस हस्तांतरीत करावी, अशी पिंपरी महापालिकेने केलेली मागणी पुणे महापालिकेने अमान्य केली आहे.

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी पवना धरणातून ६.५५ टीएमसी इतके पाणी आरक्षितप्रत्यक्ष पाणीवापर आणि लोकसंख्येनुसार लागणारे पाणी यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजुर कोट्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेस हस्तांतरीत करावी, अशी पिंपरी महापालिकेने केलेली मागणी पुणे महापालिकेने अमान्य केली आहे. ही योजना पिंपरी महापालिकेला हस्तांतरीत करणे सध्या शक्य नाही, असे स्पष्ट करत पुणे महापालिकेने पाणी देण्यास नकार दिला आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी पवना धरणातून ६.५५ टीएमसी इतके पाणी आरक्षित आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार १७ लाख ३० हजार लोकसंख्येला शहराचा पाण्याचा मापदंड १३५ लिटर प्रति माणशी प्रति दिन याप्रमाणे ठरविला आहे. शहराची लोकसंख्या आणि वार्षिक ३.६१ टीएमसी पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र, शहराची लोकसंख्या सध्या २० लाखाच्या पुढे पोहोचली आहे. त्यानुसार, ६.५५ टीएमसी मंजुर आरक्षणापैकी सध्या ४.८४ टीएमसी इतका पाणीकोटा महापालिकेसाठी मंजुर आहे. २००८ मध्ये महापालिकेला आणखी १.३१ टीएमसी पाणी कोटा मंजुर झाला. मात्र, महापालिकेची टप्पा क्रमांक ४ ही योजना अद्याप कार्यान्वित नसल्याने ४.८४ टीएमसी इतका पाणीकोटा मंजुर आहे. त्यामुळे महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे जादा पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यावर पाटबंधारे विभागाने १३ सप्टेंबर २०१७ रोजी पिंपरी महापालिकेला पत्रच पाठविले.  पिंपरी महापालिकेचा सध्याचा प्रत्यक्ष वार्षिक पाणीवापर पाच टीएमसी इतका होत आहे. हा पाणीवापर आरक्षित पाणी क्षमतेपेक्षा जादा होत आहे. प्रत्यक्ष पाणीवापर आणि लोकसंख्येनुसार लागणारे पाणी यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. ही तफावत कमी करण्यासाठी पाण्याचा वापर मर्यादित करणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणीपुरवठा वितरण प्रणाली दुरूस्ती, पाणीपुरवठ्यातील गळती रोखणे, नवीन वितरणप्रणाली करणे आदी उपाययोजना कराव्यात. भविष्यात आपल्याला वाढीव पाणी मिळणार नाही, असे पाटबंधारे विभागाने या पत्राद्वारे स्पष्ट कळविले. त्यामुळे महापालिकेने पाण्यासाठी इतर स्त्रोत उपलब्ध होतात का याची चाचपणी केली.  वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पवना नदीवरील रावेत बंधाठयातून अशुद्ध पाणी उपसून चिखली जलशुद्धीकरण वेंष्ठद्रात शुद्ध केले जाते. २७ एमएलडी क्षमतेच्या या योजनेद्वारे चिखली येथील ४० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या उंच टाकीद्वारे पुणे महापालिका हद्दीतील गणेशनगर, कळस, धानोरी, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, लोहगाव, विमाननगर, खराडी, खांदवेनगर या भांगांना पाणीपुरवठा करण्यात येतो. वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजुर कोट्यासह पिंपरी महापालिकेस हस्तांतरीत करावी, अशी मागणी पिंपरी महापालिकेने पुणे महापालिकेकडे केली. त्यावर पुणे महापालिकेने १२ आॅक्टोबर रोजी पत्राद्वारे उत्तर दिले आहे. वाघोली पाणीपुरवठा योजनेअंतर्गत होणारा पाणीपुरवठा काही ठिकाणी सध्या दिवसाआड करण्यात येत आहे. हे पाणीही सध्या अपुरे पडत आहे. त्यामुळे या भागात पुणे महापालिका अन्य स्त्रोतांमधून पाणीपुरवठा करण्यास सक्षम नाही. त्यामुळे वाघोली पाणीपुरवठा योजना पिंपरी महापालिकेस हस्तांतरण करणे सध्या तरी शक्य नाही, असे पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पिंपरी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्राद्वारे कळवत पाणी योजना हस्तांतरण करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणी