विकासाला मतदान करा : नांदगुडे

By Admin | Updated: February 13, 2017 01:45 IST2017-02-13T01:45:31+5:302017-02-13T01:45:31+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २६ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व स्थायी समितीचे माजी सभापती विलासराव नांदगुडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

Voting for development: Nandgude | विकासाला मतदान करा : नांदगुडे

विकासाला मतदान करा : नांदगुडे

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २६ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व स्थायी समितीचे माजी सभापती विलासराव नांदगुडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ वाकड गावठाण येथील म्हातोबा मंदिर येथे करण्यात आला. विकास करण्यासाठी राष्ट्रवादीला मतदान करा, असे आवाहन नांदगुडे यांनी यावेळी केले.
या वेळी वाकड गावातील ग्रामस्थ, हजारो मतदार बंधू भगिनी आणि समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उमेदवार विलास नांदगुडे, सुषमा उर्फ लिलावती शिंदे, स्वाती कलाटे आणि नितीन सुदाम इंगवले यांनी म्हातोबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
लोकसेवेचा आणि विकासाचा जागर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेल्या संधीतून सोने करणार असल्याचे नांदगुडे यांनी यांवेळी सांगितले.
विलास नांदगुडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करून आपल्या परिसराचा विकास करण्याची संधी द्यावी, असे आवाहन केले. या वेळी प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला.
या वेळी उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय शिवानंद गिरी महाराज उपस्थित होते. तसेच कलाटे परिवार ज्येष्ठ सदस्य, विनोदे वस्ती ज्येष्ठ सदस्य, वाकडकर वस्ती ग्रामस्थ व ज्येष्ठ, भुमकर वस्ती ग्रामस्थ व ज्येष्ठ सदस्य, ताथवडे, पुनावळे येथील ग्रामस्थ व
ज्येष्ठ, कस्पटे वस्ती, पिंपळे निलख गावचे ग्रामस्थ, वाकड गावचे ग्रामस्थ यांनी उमेदवारांना आशीर्वाद दिल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Voting for development: Nandgude