मतदार याद्यांमध्ये अद्यापही गोंधळच

By Admin | Updated: February 16, 2017 03:09 IST2017-02-16T03:09:24+5:302017-02-16T03:09:24+5:30

महापालिका निवडणूक विभागाच्यावतीने मंगळवारी बुथनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अनेक ठिकाणी पुन्हा प्रभागातील

Voter lists are still messy | मतदार याद्यांमध्ये अद्यापही गोंधळच

मतदार याद्यांमध्ये अद्यापही गोंधळच

पिंपरी : महापालिका निवडणूक विभागाच्यावतीने मंगळवारी बुथनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अनेक ठिकाणी पुन्हा प्रभागातील मतदारांच्या अदलाबदली झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे मतदार याद्या आणि गोंधळाचे समीकरण पुन्हा कायम असल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेच्यावतीने ४१ प्रभागांमधील ३ हजार ४४२ मतदान केंद्रनिहाय मतदारांची यादी मंगळवारी संकेतस्थळावर जाहीर केली. त्यामध्ये प्रभाग १७ मध्ये सदाशिव पेठेतील मतदारांची नावे आल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर उपनगरांमध्येही अनेक ठिकाणी मतदारांची अदलाबदली झाल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेच्या ४१ प्रभागनिहाय मतदारांची पारूप मतदार यादी १२ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली. त्यानंतर त्यावर १७ जानेवारीपर्यंत हरकती व तक्रारी नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ९०९ तक्रारी निवडणूक विभागांकडे दाखल झाल्या होत्या. त्यानुसार मतदार यादीमध्ये बदल करण्यात आले होते. मात्र तरीही अनेक प्रभागातील मतदारांची अदलाबदल कायम राहिली असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Voter lists are still messy