शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पिंपरीत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 19:23 IST

नागरिकत्व सुधारणा कायदा लोकशाहीला काळिमा तसेच संविधानाच्या उद्देशिकेला हरताळ फासणारा..

ठळक मुद्देकेंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी..

पिंपरी : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात पिंपरीत शांततेत आंदोलन करण्यात आले. हा कायदा लोकशाहीला काळिमा तसेच संविधानाच्या उद्देशिकेला हरताळ फासणारा आहे. त्यामुळे हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. हिंदू मुस्लिम एक है, मोदी- शहा फेक है यासह केंद्र सरकार विरोधात या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कुल जमाअती तंजीम, पिंपरी-चिंचवड या संघटनेतर्फे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन झाले. मौलाना अलीम अन्सारी, अब्दुल गफ्फार, नय्यर नुरी, फै ज अहमज फै जी, मुफ्ती आबिद रजा, कारी इकबाल, मौलाना उमर गाझी, तन्वीर रिजवी, मौलाना मुब्बशीर, मौलाना मुक्तदिर कादरी, जनाब अकील मुजावर, हाजी गुलजार, युसूफ कुरेशी, गुलाम रसुल, नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, बाबा कांबळे, धम्मराज साळवे, संतोष शिंदे, अंजना गायकवाड, सुरेश रोकडे, सर्वजीत बनसोडे, देवेंद्र तायडे आदी या वेळी उपस्थित होते. सुमारे पाच हजार मुस्लिम समाजबांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. मानव कांबळे, मारुती भापकर, तसेच मुस्लिम बांधवांनी या वेळी मनोगत व्यक्त करताना केंद्र सरकारवर टीका केली. मुस्लिम समाजाला त्रास देण्याच्या उद्देशाने नागरिकत्व सुधारणा कायदा तयार करण्यात आला आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या तत्वांवर भारतीय लोकशाहीचा डोलारा आधारलेला आहे. या मूळ तत्वानांच सुरुंग लावण्याचे काम या माध्यमातून करण्यात येत आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य तत्वानुसार व्यक्तिला केंद्रबिंदू मानून राज्य करणारा देश आहे. असे असतानाही देशात एनआरसी कायदा लागू करण्याचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आग्रह आहे. त्यामुळे मुस्लिम व इतर बहुजन समाज भयभीत झाला आहे. प्रचंड विरोध असतानाही आसाम येथे एनआरसी कायदा लागू केला आहे. यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत मुस्लिम समाजच नव्हे तर संविधानाला मानणाºया सर्व समाजातील लोकांमध्ये याबाबत नाराजी आहे. आंदोलनाच्या माध्यमातून ही नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकत्व सुधारणा कायदा त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी मान्यवरांनी मनोगतातून व्यक्त केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकGovernmentसरकार