शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : थेट खिशात लाच स्वीकारताना महिला वाहतूक पोलीस सोशल मीडियावर ‘व्हायरल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 20:59 IST

एक महिला वाहतूक पोलीस खिशात लाच स्वीकारत असल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे...

पिंपरी : वाहतूक नियमनासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. वाहनचालकांसह वाहतूक पोलीसही या कॅमेऱ्यांच्या निगराणीत येतात. असे असतानाही काही वाहतूक पोलीस वाहनचालकांकडून लाच स्वीकारत असल्याचे दिसून येते. अशीच एक महिला वाहतूक पोलीस खिशात लाच स्वीकारत असल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.  

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याचा सातत्याने आढावा घेतला जात असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जोरदार कारवाई सुरू आहे. पिंपरीतील साई चाैक व शगुन चौकात वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत होती. या कारवाई दरम्यानची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

एका दुचाकीवरील दोन महिलांना वाहतूक पोलिसांनी अडविले. त्यापैकी एक तरुणी तेथील महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या जवळ येते. महिला पोलीस त्या तरुणीला सूचना देते. त्यानंतर तरुणी पुन्हा महिला पोलिसाजवळ येते. त्यावेळी महिला पोलीस तिला पाठमोरी होते. सूचनेप्रमाणे तरुणी महिला पोलिसाच्या मागच्या खिशात पैसे ठेवत असल्याचे क्‍लिपमध्ये दिसून येते. 

पिंपरीतील शगुन चाैक येथील ही क्लिप असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. याबाबत चाैकशी करण्यात येत आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.- श्रीकांत डिसले, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWomenमहिलाtraffic policeवाहतूक पोलीसCorruptionभ्रष्टाचारBribe Caseलाच प्रकरण