स्वाइन फ्लूने महिलेचा बळी

By Admin | Updated: September 17, 2015 02:46 IST2015-09-17T02:46:03+5:302015-09-17T02:46:03+5:30

स्वाइन फ्लूने एका २०वर्षीय महिलेचा बळी गेला आहे. या महिलेचा १३ सप्टेंबर रोजीच मृत्यू झाला होता. मात्र, माहिती जाहीर करण्यास दोन दिवस विलंब लागला

The victim of the swine flu woman | स्वाइन फ्लूने महिलेचा बळी

स्वाइन फ्लूने महिलेचा बळी

पिंपरी : स्वाइन फ्लूने एका २०वर्षीय महिलेचा बळी गेला आहे. या महिलेचा १३ सप्टेंबर रोजीच मृत्यू झाला
होता. मात्र, माहिती जाहीर करण्यास दोन दिवस विलंब लागला. ही
महिला हडपसर येथील कुंजीरवाडी येथील होत्या.
सध्या शहरातील एकूण रुग्णांत स्वाइन फ्लूसदृश रुग्णांची संख्या ही दहा टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे शहरात सर्दी, खोकल्याचे रुग्ण अधिक आढळून येत आहेत. शहरातील स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. स्वाइन फ्लूमुळे बळी पडलेल्या रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४७ झाली. गणेशोत्सवाच्या काळात शहरात गर्दी होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वाइन फ्लूची काळजी घेणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The victim of the swine flu woman