रस्त्यावरील खडीमुळे वाहनांना अडथळे
By Admin | Updated: May 10, 2017 04:06 IST2017-05-10T04:06:31+5:302017-05-10T04:06:31+5:30
येथील संतोषनगर ते डांगे चौक रस्त्यावर ड्रेनेजचे काम करण्यासाठी रस्ता खोदण्यात आला होता. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर

रस्त्यावरील खडीमुळे वाहनांना अडथळे
लोकमत न्यूज नेटवर्क
थेरगाव : येथील संतोषनगर ते डांगे चौक रस्त्यावर ड्रेनेजचे काम करण्यासाठी रस्ता खोदण्यात आला होता. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता व्यवस्थित केला नसल्यामुळे वाहनांना अडथळे निर्माण होत होऊन वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या ठिकाणी अनेक दिवसांपासून ड्रेनेज चोकअपमुळे नागरिक त्रस्त होते. अनेक वेळा तक्रारी केल्यानंतर या ठिकाणी प्रशासनाने येथील ड्रेनेजलाइन बदलून नवीन लाइन टाकण्याचे काम हाती घेतले. यासाठी येथील रस्ता खोदण्यात आला होता. पण ड्रेनेजचे काम झाल्यावर खोदलेला रस्ता व्यवस्थित न करता या ठिकाणी फक्त खोदलेली माती आहे तशी खड्ड्यामध्ये भरून टाकण्यात आली आहे आणि त्यामुळे येथे खोदलेल्या रस्त्याची माती व खडी पसरलेली असल्यामुळे वाहने अनेक वेळा घसरून अपघात होत आहेत. लवकरात लवकर या ठिकाणी डांबर टाकून रस्ता व्यवस्थित करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.