शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

भुयारी मार्गात वाहनांचा होतोय खोळंबा; पुलाची उंची कमी असल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 02:54 IST

कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर ताथवडे, पुनावळे येथील समस्या

वाकड : कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर भुयारी मार्गाच्या पुलाची उंची कमी असल्याने वाहनांचा खोळंबा होत आहे. ताथवडे-पुनावळेदरम्यानच्या या भुयारी मार्गात पाणी साचून वाहनांचा खोळंबा होऊन कोंडी होत आहे. या पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिणामी वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या कात्रज-देहूरोड बाह्यवळण रस्त्याच्या ताथवडे आणि पुनावळेदरम्यानच्या भुयारी मार्गाच्या पुलाची ही समस्या आहे. पुलाखाली सखल भाग असल्याने या भुयारी मार्गात पाणी साचते.पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. बाह्यवळण मार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी आयआरबी या कंपनीकडे आहे. या कंपनीने संबंधित पुलाची उंची वाढवून ही समस्या सोडवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पहिल्याच पावसात यंदा या पुलाखाली तब्बल पाच ते सहा फूट पाणी साचले होते. पाण्याचा निचरा होत नसल्याने गेल्या सहा वर्षांपासून दर पावसाळ्यात येथे पाणी साठते. वाहतूक ठप्प होते़ काही काळ गावांचा संपर्क तुटतो. जेव्हा काही प्रमाणात पाणी ओसरते तेव्हा जोखीम पत्करून वाहनचालकांना ये-जा करावी लागते.गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या भेडसावत आहे. मात्र तेव्हा लोकसंख्या विरळ असल्याने या समस्येची तीव्रता एवढी जाणवत नव्हती. मात्र या पंचक्रोशीत अनेक मोठे गृहप्रकल्प उभे राहिल्याने प्रामुख्याने आयटीत काम करणारे आयटीयन्स येथे वास्तव्यास आले. त्यामुळे दोन वर्षांपासून लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. येथे राहण्यास आलेले आयटीयन्स वाकड भूमकर चौकमार्गे न जाता पर्यायी व विना कोंडीचा मार्ग म्हणून जांबे-पुनावळे-मारुंजी मार्गे जात असल्याने या सर्वांना या पुलांचा वापर करून पुढे जावे लागते. मात्र या समस्येमुळे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने आयटीयन्ससह सर्वांनाच मनस्तापाला सामोरे जावे लागते. या समस्येची प्राधिकरण प्रशासनाला गंभीरता नाही. यावर कायमचा तोडगा काढून भुयारी मार्गाची उंची वाढविणे अत्यंत आवश्यक आहे.रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्यामुळे पुनावळे आणि ताथवडे येथील भुयारी मार्गाच्या पुलाजवळ रोजच वाहतूक समस्येला सामोरे जावे लागते. हे काम त्वरित करावे यासाठी राष्ट्रवादीचे नेते व हमारा साथी हेल्पलाइनचे समन्वयक संदीप पवार यांनी आयआरबीला नुकतेच निवेदन दिले होते. नागरीकरणामुळे या भागात १० वर्षांत प्रचंड मोठा बदल झाला. शहरीकरण झाले. त्यामुळे एक दोन भुयारी मार्गाची दुरुस्ती करण्यापेक्षा सर्वच पुलांचे सर्वेक्षण करून भविष्यातील गरजेप्रमाणे जागोजागी नवीन भुयारी मार्ग उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त आणि आम्ही असा एकत्र प्रस्ताव करून ते केंद्राकडे पाठविला तर त्याला त्वरित मंजुरी मिळून काम जलद होईल, अशी एखादी एकत्रित बैठकीचे आयोजन होणे अपेक्षित आहे.- मिलिंद वाबळे, कार्यकारी अभियंता, आयआरबीपावसामुळे कामे करण्यास अडथळाभुयारी मार्गाची समस्या लवकर सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र काही वेळा पाऊस असल्यामुळे कामे करता येत नाहीत. पावसाचा अंदाज बघून लवकरच ही समस्या सोडविली जाईल, असे आयआरबीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांनाही दिलासा मिळेल.- राहुल कलाटे, शिवसेना गटनेता, महापालिकात्वरित उपाययोजना करण्याची गरजगेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या आहे. यासाठी मी वारंवार पाठपुरावा केला़ मात्र आयआरबी प्रशासनाने याकडे नेहमीच काणाडोळा केला़ या पावसाळ्यात ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते. त्यामुळे हे काम त्वरित करण्यात यावे, अशी मागणी सारथी हेल्पलाईनचे समन्वयक संदीप पवार यांनी केली आहे.पावसाळ्यात वाहतुकीची समस्यामहामार्गाच्या कामानंतर या रस्त्याची उंची वाढली हे काम करताना भुयारी मार्गाचा कुठलाही विचार करण्यात आला नाही. रस्ता उंच झाल्याने भुयारी मार्गात सखल भाग तयार झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात भुयारी मार्गात सखल भागात पाणी साचते. पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे तासन्तास वाहतूक ठप्प होते. याचा सर्वांनाच नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागतो मनस्तापपिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगतचा हा भाग नव्याने विकसित होत आहे. अत्यंत वर्दळीच्या असलेल्या हिंजवडी आयटी पार्कमधून पिंपरी-चिंचवड शहराच्या दिशेने रावेत, देहूरोड, प्राधिकरण, चिंचवड आदी भागांत जाण्यासाठी नागरिक या पर्यायी मार्गाचा वापर करतात. उच्च शिक्षण देणाऱ्या असंख्य नामांकित शिक्षण संस्था व शाळा या भागात आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची येथे मोठी वर्दळ असते. त्यांचीही मोठी हेळसांड होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड