शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवडमधील गुजरनगर येथे वाहनांची तोडफोड; डिझेलही गेले चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 16:25 IST

वाहन तोडफोडीचे सत्र पिंपरी-चिंचवडमध्ये अद्याप थांबलेले नाही. रविवारी रात्री १ च्या दरम्यान थेरगावमधील गुजरनगर परिसरात अज्ञात व्यक्तींनी रस्त्यावर पार्क केलेल्या पाच-सहा गाड्यांची तोडफोड केली व पसार झाले.

ठळक मुद्देअज्ञात व्यक्तींनी परिसरात रस्त्यावर पार्क केलेल्या पाच-सहा वाहनांची केली तोडफोडगेल्या महिन्याभरात वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ

थेरगाव : वाहन तोडफोडीचे सत्र पिंपरी-चिंचवडमध्ये अद्याप थांबलेले नाही. रविवारी रात्री १ च्या दरम्यान थेरगावमधील गुजरनगर परिसरात अज्ञात व्यक्तींनी रस्त्यावर पार्क केलेल्या पाच-सहा गाड्यांची तोडफोड केली व पसार झाले. तसेच फोडलेल्या गाड्यांचे कित्येक लिटर डिझेलही चोरीला गेले आहे.गुजरनगर परिसरात रविवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी परिसरात रस्त्यावर पार्क केलेल्या पाच-सहा वाहनांची तोडफोड केली. या अज्ञातांनी दहशत निर्माण करण्यासाठी किंवा कसला राग काढण्यासाठी लाठ्या आणि दगडांच्या साह्याने वाहनांची तोडफोड केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तसेच परिसरात मोकळ्या मैदानावर रात्री काही मद्यपी बसलेले असतात. त्यांनी हे कृत्य केले असावे, अशीही शक्यता स्थानिकांनी व्यक्त करीत आहेत. तोडफोड झालेल्या वाहनांमध्ये इनोव्हा, टेम्पो ट्रॅव्हलर, बस, कार या वाहनांच्या काचा फोडल्या असून यामध्ये गाड्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

गेल्या महिन्याभरात वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. थेरगाव गावठाण, घरकुल परिसर, चिंचवडगाव, नेहरूनगर, संतनगर-भोसरी, साने चौक, सांगवी परिसरात यापूर्वी वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा वाहन तोडफोडीच्या घटना रोखण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत व परिसरातील पोलिसांचा वाचक कमी झाला आहे असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

मागील वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये तोडफोडीच्या काही घटना घडल्यानंतर हे वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. गुजरनगर येथे घडलेल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक धनराज किरनाळे अधिक तपास करीत आहेत. वारंवार होणाऱ्या या वाहनांच्या तोडफोडीच्या घटनांमुळे थेरगाव परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Thergaonथेरगावpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड