पिंपळे गुरवमध्ये वाहनांची जाळपोळ

By Admin | Updated: February 11, 2017 02:27 IST2017-02-11T02:27:23+5:302017-02-11T02:27:23+5:30

वाहनांची जाळपोळ, दगडफेकीत वाहनांचे नुकसान या घटना पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन नाहीत. निवडणूक जवळ येऊ लागताच विविध भागात या घटना घडल्या

Vehicle arson in Pimpale Gurav | पिंपळे गुरवमध्ये वाहनांची जाळपोळ

पिंपळे गुरवमध्ये वाहनांची जाळपोळ

पिंपरी : वाहनांची जाळपोळ, दगडफेकीत वाहनांचे नुकसान या घटना पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन नाहीत. निवडणूक जवळ येऊ लागताच विविध भागात या घटना घडल्या. आता प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना, पिंपळे गुरव परिसरात शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास अज्ञाताने सहा दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली आहे.
यापूर्वी अशा घटनांतून दहशत माजविण्याचे प्रकार जेथे घडले, तेथील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे कठोर पाऊल पोलिसांनी उचलले. त्यानंतरही अशा घटना घडतच आहेत, याचा अर्थ या घटनांमागे गुंड प्रवृत्ती नसून, राजकारणातील गुन्हेगारी वृत्ती असावी, अशी शंका नागरिक उपस्थित करू लागले आहेत. शुक्रवारी पहाटे योगेश इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या दुचाकींना आग लावण्यात आल्याने सहा दुचाकी खाक झाल्या. निगडीत गुरुवारी रात्री दगड मारून एका रिक्षाचे नुकसान केले. पाठोपाठ ही घटना घडली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Vehicle arson in Pimpale Gurav