शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी पिंपरीत उद्या विविध संघटना करणार अन्नत्याग आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 12:10 IST

शेतकरी व कामगार विरोधी कायदे करून केंद्र सरकारने अन्याय केला आहे.

पिंपरी : नवीन कृषी विधेयक व कामगार कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांकडून दिल्ली येथे आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी भारत बंद पुकारण्यात आला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पिंपरीत मंगळवारी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच शहरवासीयांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विविध संघटना, राजकीय पक्ष यांच्याकडून करण्यात आले आहे. 

पुणे जिल्हा कामगार संघटनांच्या कृती समितीचे अध्यक्ष डाॅ. कैलास कदम, स्वराज अभियानचे मानव कांबळे, माजी आमदार गाैतम चाबुकस्वार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, आयटकचे अनिल रोहम, शेतकरी कामगार पक्षाचे नितीन बनसोडे, नागरी हक्क सुरक्षा समितीचे गिरीश वाघमारे, प्रहार संघटनेचे संजय गायखे, रिक्षा पंचायतचे अशोक मिर्गे, समाजवादी पार्टीचे रफीक कुरेशी, प्रा. नरेंद्र पवार, डीवायएफआयचे सचिन देसाई, सीपीएमचे गणेश दराडे, श्रमिक एकता महासंघाचे दिलीप पवार, काॅंग्रेसचे शाम आगरवाल, शेतकरी कामगार पक्षाच्या छायावती देसले, छावा संघटनेचे धनाजी येळकर पाटील, शिवशाही व्यापारी संघाचे युवराज दाखले, भारतीय लहुजी पॅंथरचे संदीपान झोंबाडे, बाराबलुतेदार महासंघाचे विशाल जाधव, हाॅकर्स संघटनेचे काशिनाथ नखाते आदी या वेळी उपस्थित होते. 

कैलास कदम म्हणाले, शेतकरी व कामगार विरोधी कायदे करून केंद्र सरकारने अन्याय केला आहे. त्याविरोधात देशातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्याला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी पिंपरी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकात आंदोलन केले जाईल. सकाळी दहाला विविध संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. व्यापारी व व्यावसायिकांसह शहरवासीयांनी आंदोलनात सहभागी व्हावे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडagitationआंदोलनStrikeसंप