शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही भाई आहोत, म्हणत गाड्यांची दापोडीत तोडफोड; दोन जणांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 08:44 IST

शनिवारी रात्री ११च्या सुमारास हा प्रकार घडला...

पिंपरी : दहशत माजविण्याच्या इरद्याने आठ जणांच्या टोळक्याने सुंदरबाग कॉलनी, दापोडी येथे दोन कार, टेम्पो, दुचाकीच्या काचा दगडाने व पेव्हिंग ब्लॉकने फोडल्या. तसेच तेथे आलेल्या दोन जणांना मारहाण करत “आम्ही येथील भाई आहोत, पोलिसांत तक्रार कराल तर याद राखा”, अशी धमकी दिली. शनिवारी रात्री ११च्या सुमारास हा प्रकार घडला.

या तथाकथित भाईंवर पोलिसांनी कारवाई करत चार जणांना अटक केली आहे. याप्रकरणी संदीप विनायक बागुल (वय, ४८, सुदंरबाग कॉलनी, दापोडी) यांनी फिर्याद दिली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे शेखर सुदाम भालेराव (वय २०, रा. दापोडी) अंकित सुदाम भालेराव (वय २१, दापोडी), सुमित भीम सूर्यवंशी (वय १९, रा. फुलेनगर, दापोडी), रोनित मोरे (वय १९, दापोडी) अशी आहेत. तर, रोहित सरोदे (वय २०, दापोडी), आदित्य कांबळे (वय २१), अजय जाधव (वय २०) रोहित मनतोडे हे आरोपी फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दहशत माजविण्यासाठी सुंदरबाग कॉलनीतील सार्वजनिक रोडवर मोठमोठ्या आवाजात आरडाओरडा करत दोन कार, एक टेम्पो आणि एका दुचाकीची दगड आणि पेव्हिंग ब्लॉकद्वारे फोडल्या. यावेळी फिर्यादी आणि त्याचा भाऊ पराग बागूल यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी शेखर भालेराव, अंकित भालेराव व सुमित सूर्यवंशी यांनी फिर्यादी आणि पराग बागुल यांना मारहाण करत त्यांच्या जवळील १,२०० रुपये काढून घेत “आम्ही इथले भाई आहोत. तुम्ही आमचे काय वाकडे करणार? तुम्ही जर पोलिसांत तक्रार केली तर तुम्हाला सोडणारी नाही.” अशी धमकी दिली.

टॅग्स :Puneपुणेdapodiदापोडीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड