मावळात अवैध धंद्यांना ऊत

By Admin | Updated: February 14, 2016 03:21 IST2016-02-14T03:21:34+5:302016-02-14T03:21:34+5:30

मावळात जमिनीचे भाव गगनाला भिडल्यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीमध्ये अफरातफर करून पैसे कमावणाऱ्याची संख्या वाढत आहे. हाच पैसा अवैद्य धंद्यासाठी उपयोगात

In the Valley, illegal trades take place | मावळात अवैध धंद्यांना ऊत

मावळात अवैध धंद्यांना ऊत

वडगाव मावळ : मावळात जमिनीचे भाव गगनाला भिडल्यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीमध्ये अफरातफर करून पैसे कमावणाऱ्याची संख्या वाढत आहे. हाच पैसा अवैद्य धंद्यासाठी उपयोगात आणला जात आहे. पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंदे वाढत असल्याची चर्चा मावळ परिसरात आहे.
मावळात पोलीस ठाण्याच्या प्रशस्त इमारती आहेत. काम करणारे अधिकारीही धडाकेबाज आहेत. तरीही परिसरातील अवैध धंदे कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. मुबई -पुणे महामार्गावर रात्री साडेअकरानंतर सर्रास हॉटेल चालू असतात. त्यातील १० ते १५ टक्केच हॉटेलचे परवाने आहेत. इतर सर्व विनापरवाना हॉटेल पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. संबंधित हॉटेलमध्ये सर्रास खुलेआम दारूविक्री केली जाते. रात्री अनेक बेकायदा व्यवहारही या ठिकाणी चालविले जातात. महामार्गावरील ट्रकचालकांना लुटण्याचे प्रकारदेखील वाढले आहेत. मात्र, हे सर्व प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून कोणतीही ठोस पावले उचलली जाताना दिसत नाही.
घरगुती भांडणे झाली, की खाकी वर्दीचा धाक पोलीस दाखवितात. मग, इतके अवैध धंदे चालू असताना पोलीस गप्प का? कारवाई का करत नाहीत? यामागे काही हितआर्थिक सबंध आहेत का? असे सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
वडगाव- तळेगाव हद्दीत तर भरदिवसा महामार्गावर वेश्याव्यवसाय चालतो. हा व्यवसायाला काही मंडळींचा आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे. महामार्गावरील अनेक हॉटेलवर हा व्यवसाय चालतो. परंतु, पोलीस कारवाई करताना दिसत नाही. कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदी असलेल्या गुटखा आणि आरोग्यास हानिकारक असलेल्या पान मसाल्याची विक्री अगदी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या परिसरात होते. (वार्ताहर)

पवनानगरमध्ये खुलेआम विक्री
ग्रामीण परिसरात गावठी दारूची विक्री खुलेआम व जोरात सुरू आहे. गांजा, जुगार, मटका अड्डे चालू आहेत. पवनानगरमध्ये तर हे सगळे खुलेआम चालू असताना पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे मोर्वे येथील महिलांनीच पुढाकार घेऊन काही दारूचे अड्डे शुक्रवारी उद्ध्वस्त केले. जे काम पोलिसांचे आहे, ते काम नागरिकांना पुढे येऊन करावे लागत असल्याची परिस्थिती आहे.

वडगावच्या हद्दीतील सर्व अवैध दारू विके्रत्यांवर वेळोवेळी कारवाई केली आहे. पुढेही असे काही निदर्शनात आल्यास लगेच कारवाई केली जाईल. महामार्गावरील हॉटेल्सवर बारकाईने लक्ष असून, अवैध धंदे दिसल्यास कारवाई करू. -विजय जाधव, पोलीस निरीक्षक, वडगाव मावळ

Web Title: In the Valley, illegal trades take place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.